scorecardresearch

Athiya Shetty-KL Rahul Wedding: प्रोफेसर आहेत अथिया शेट्टीचे सासू-सासरे; के.एल.राहुलच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्या

Athiya Shetty-KL Rahul Wedding: के.एल.राहुलच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्या

Athiya Shetty-KL Rahul Wedding: प्रोफेसर आहेत अथिया शेट्टीचे सासू-सासरे; के.एल.राहुलच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्या
के.एल.राहुल-अथिया शेट्टीची लगीनघाई. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

के.एल.राहुल व अथिया शेट्टी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर अथिया व के.एल.राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. त्यांचे संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. के.एल,राहुलशी लग्नगाठ बांधल्यानंतर अथिया कनौर घराण्याची सून होणार आहे. के.एल.राहुल हा भारताचा स्टार क्रिकेटर आहे. मैदानावरील त्याच्या उत्तम खेळीसाठी तो ओळखला जातो.

हेही वाचा>> अथिया शेट्टी-के.एल.राहुल विवाहबंधनात अडकणार; लग्न मुहुर्ताच्या वेळेबाबत मोठी माहिती समोर

३० वर्षीय के.एल.राहुलचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव के.एन.लोकेश असं आहे. तर त्याच्या आईचं नाव राजेश्वरी असं आहे. राहुलचे वडील कर्नाटकातील एनआयटीमध्ये सिव्हिल इंजिनियर प्रोफेसर आहेत. तर त्याची आईही महाविद्यालयात शिक्षिका आहेत. के.एल.राहुलला मोठी बहीणही आहे. तिचं नाव भावना असून तिचं गेल्याचं वर्षी लग्न झालं आहे.

हेही वाचा>> “घरातून लव्ह मॅरेजला…”, ‘रंग माझा वेगळा’मधील ‘दीपा’ची पोस्ट चर्चेत

हेही पाहा>> Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नात बॉलिवूडसह क्रिकेटविश्वातील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सलमान खान, शाहरुख खानसह विराट कोहली, अनुष्का शर्मा, एम.एस.धोनी हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या