scorecardresearch

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू; विद्युत रोषणाईनं सजलं क्रिकेटपटूचं मुंबईतील घर

अथिया व राहुलच्या लग्नानिमित्त केएल राहुलच्या घरी तयारी सुरू झाली आहे.

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू; विद्युत रोषणाईनं सजलं क्रिकेटपटूचं मुंबईतील घर
(फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढच्या आठवड्यात दोघांचं लग्न होणार आहे. अथिया व राहुलच्या लग्नानिमित्त केएल राहुलच्या घरी तयारी सुरू झाली आहे.

केएल राहुलचे पाली हिल इथले घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजले आहे. त्याच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुलच्या घराची सजावट सुरू झाल्यानंतर तो अथियाशी २३ तारखेला लग्न करणार असल्याच्या चर्चा खऱ्या असल्याचं म्हटलं जातंय. अद्याप राहुल-अथिया किंवा त्यांच्या कुटुंबीयांना लग्नाच्या कोणत्याही तारखांना दुजोरा दिलेला नाही. पण, दोघांचं लग्न होणार असल्याचं सुनील शेट्टी स्वतः म्हणाले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुल २३ जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात लग्न करणार आहेत. २१ जानेवारीपासून हळदी, संगीत आणि मेहंदीचे विधी सुरू होणार आहेत. या लग्नसोहळ्यात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असल्याचंही म्हटलं जातंय. अथिया व राहुल २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी त्यांचं नातं जाहीरपणे स्वीकारलं असून ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 08:11 IST

संबंधित बातम्या