scorecardresearch

के.एल.राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

KL Rahul-Athiya Shetty Wedding: के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत.

के.एल.राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
के.एल.राहुल-अथिया शेट्टी अडकले विवाहबंधनात. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

KL Rahul-Athiya Shetty Wedding: भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सुनील शेट्टीने अथिया व के.एल.राहुलच्या लग्नाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने पापाराझींना मिठाईही वाटली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> के.एल.राहुल-अथिया शेट्टीची लगीनघाई, अभिनेत्रीला हळद लावतानाचा फोटो व्हायरल

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने जावई के.एल.राहुलबाबत भाष्य केलं. सुनील शेट्टी म्हणाला, “मला के.एल.राहुलचे वडील व्हायला आवडेल, सासरा नाही”. सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी खास लुंगी व सदरा असा दाक्षिणात्य पोशाख केला होता.

हेही पाहा>> Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या