बॉलिवूडचे महानायक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल सर्वांना माहीत आहे. त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या, लेक श्वेता नंदा व त्यांची मुलं सर्वांना परिचित आहेत. पण, तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या भावाबद्दल माहीत आहे का? होय. अमिताभ यांना लहान भाऊ असून त्यांचं नाव अजिताभ बच्चन आहे. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, तसेच ते भारतात राहत नाहीत. हेही वाचा - २५ लाखांसाठी दोन प्रश्न अन् तीन लाइफलाइन; तरीही ‘कोण होणार करोडपती’च्या स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर? 'डीएनए'च्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांचे पालक डॉ. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांना १८ मे १९४७ रोजी दुसरा मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव अजिताभ बच्चन ठेवले. अमिताभप्रमाणेच अजिताभ यांनीही नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. अजिताभ हे खूप हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना बिझनेसची खूप आवड होती. कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अजिताभ यांनी उद्योजक होण्याचा प्रवास सुरू केला. काही वर्षे भारतात काम केल्यानंतर अजिताभ लंडनला गेले आणि ते एक प्रतिष्ठित उद्योगपती बनले. 'कंपनी चेक'नुसार, अजिताभ हे क्यूए हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड, एएसएन हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एएसएन इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; सारा अली खान सडेतोड उत्तर देत म्हणाली, “या माझ्या…” अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला आहे. 'बॉलिवूड शादी'च्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी अजिताभ आणि रमोला यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमिताभ यांनीच त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली. अमिताभ व रमोलाची मैत्री होती. त्यांनीच भावाशी तिची ओळख करून दिली, त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले, त्यांनी लग्न केलं आणि ते लंडनला गेले. अजिताभ आणि रमोला यांना चार अपत्ये आहेत. भीम नावाचा एक मुलगा, व निलिमा, नम्रता आणि नयना नावाच्या तीन मुली आहेत. भीम एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. तर, नयनाने अभिनेता कुणाल कपूरशी लग्न केलं आहे.