अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू होय. तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. ती सध्या तिच्या ‘भोला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘भूल भुलैया २’, ‘दृश्यम २’ आणि आता ‘भोला’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तब्बू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
तब्बूचं दाक्षिणात्या सुपरस्टार नागार्जून यांच्याशी असलेलं प्रेम प्रकरण एकेकाळी खूप गाजलं होतं. नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. त्यावेळी ते दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशिप जवळजवळ १० वर्षे होते, पण नागार्जुन विवाहित होते. त्यांना तब्बूशी असलेलं नातं कायम ठेवायचे होतं, पण पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. तब्बूला मात्र हे मान्य नव्हते. यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यानंतर तब्बूने लग्नच केले नाही, असं म्हटलं जातं.
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांची लव्ह स्टोरी नेमकी कधी सुरू झाली, जाणून घ्या
दरम्यान, तब्बू बऱ्याचदा मनासारखा मुलगा मिळाला नाही, म्हणून लग्न न केल्याचं सांगते. अविवाहित असलेल्या तब्बूने कधीही मूल दत्तक घेण्याचा विचार केला नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लग्न केले नाही पण मूल दत्तक घेतले. याबाबत एकदा तब्बूला विचारले असता ती म्हणाली होती, “मूल दत्तक घ्यायचे असते, तर मी खूप आधी घेतले असते, पण जर मुलाला आई-वडिलांचे प्रेम मिळणार नसेल, तर त्याला दत्तक घेऊन काही उपयोग नाही.”
दरम्यान, अजयमुळे आपलं लग्न झालं नसल्याचं एकदा तब्बू म्हणाली होती. “माझ्या वाढत्या वयामध्ये अजय माझा सगळ्यात जवळच्या मित्रांपैकी एक होता. माझा चुलत भाऊ समीर आर्य याच्या शेजारी अजय राहत होता. समीर-अजय यांच्या मैत्रीमुळे माझी आणि अजयची ओळख झाली. समीर-अजय तेव्हा माझ्या मागे मागे यायचे. माझ्या मागे कोणी मुलगा दिसला तरी त्याला धमकी द्यायचे. आज मी अजयमुळेच एकटी आहे,” असंही एकदा तब्बू म्हणाली होती.