बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते परेश रावल आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतातच, मात्र आपल्या विचारांवर आणि मतांवर ते ठाम असतात. सध्या ते एका अडचणीत सापडले आहेत. गुजरातमध्ये भाषण करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे त्यांच्या विरोधात आता एफआयर दाखल करण्यात आली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचारादरम्यान त्यांनी बंगाली लोकांच्याबाबतीत एक वक्तव्य केलं ज्यावरून त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात आली. पश्चिम बंगालचे राज्य सचिव एमडी सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात एफआयर दाखल केली आहे. सलीम यांनी असा आरोप केला आहे की परेश रावल यांच्या वक्तव्यामुळे दंगे भडकू शकतात. तसेच बंगाली आणि इतर समुदायाच्या संबंधामध्ये बिघाड होऊ शकतात. माध्यमांच्या माहितीनुसार परेश रावल यांच्या विरोधात IPC १५३, १५३ A, १५३ B, ५०४, ५०५ असे कलम लावण्यात आले आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
pankaja munde ready to negotiate with mahadev Jankar to bring him back in nda
पक्षाने सांगितले तर जानकर यांच्यासमवेत चर्चा करण्यास तयार – पंकजा मुंडे यांची माहिती

“गॅस सिलिंडर दिला तर बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”, परेश रावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाली नाराज

परेश रावल भाषण करत असताना असं म्हणाले, सध्या गॅस सिलेंडर महाग आहे, त्याची किंमत कमी होईल, लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमधील जनता महागाईचा सामना करेल. पण समजा बाजूच्या घरात रोहिंग्या शरणार्थी किंवा बांगलादेशी आले तर त्या स्वस्त गॅस सिलेंडरचं काय करणार? त्या बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहे. एका समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अशी जहरी टीका होत असल्याचं सोशल मीडियावर म्हंटलं जात आहे.

‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

सोशल मीडियावर लोक व्यक्त होत असल्याने याविषयी परेश रावल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. परेश यांनी ट्वीट करत त्यांनी बाजू मांडली आहे. ते म्हणतात, “मासे खाणं हा मुद्दा अजिबात नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली फक्त अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाच संबोधून म्हणालो आहे. तरी मी तुमचं मन आणि भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”