Komal Rani Swarnkar Allegations on Govinda wife Sunita Ahuja : बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वादावर आता कोमल राणी स्वर्णकार हिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदासोबत अफेअरच्या होत असलेल्या चर्चांवर कोमल राणीने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत सुनीता आहुजांवर गंभीर आरोप केले आहेत. “आपल्या पतीला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याचा मानसिक छळ करून त्याला घरात बसवणाऱ्या महिलेचा तळतळाट कोणालाही लागत नाही,” असं तिने म्हटलंय.
कोमल राणी स्वर्णकार हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुनीता आहुजा गोविंदाला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर आपला अजेंडा चालवण्यासाठी माझं नाव वापरू नका, असंही तिने लिहिलंय.
आधीच मोडलेला संसार… काय म्हणाली कोमल राणी?
“जी महिला स्वतःच्या पतीला रस्त्याने चालताना मारण्याचा प्रयत्न करत असेल, अशा महिलेचा तळतळाट कोणालाही लागत नाहीत. आधीच मोडलेला संसार कोणी पुन्हा मोडू शकत नाही. आपल्या देशातील लोक इतके मूर्ख नाहीत की, ‘कावळ्याने कान नेला’ असं कोणीही सांगितलं म्हणून ते लगेच कावळ्यामागे धावत सुटतील,” अशा शब्दांत कोमल राणीने सुनीता आहुजांना सुनावलं.
पुढे ती म्हणाली, “या महिलेला नक्की कशाचा त्रास होतोय हे मला समजत नाही. झालेल्या त्रासातून सावरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्याचं जाहीर प्रदर्शन करण्यातच तिला आनंद मिळतोय, असं दिसतंय. खरंच तिला दुःख होतंय की हे पूर्णपणे विचार करून रचलेले एक षडयंत्र आहे?” असा सवाल कोमल राणी स्वर्णकारने केला.

सुनीता आहुजांवर कोमल राणीचे गंभीर आरोप
सुनीता आहुजा गोविंदाला मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख कोमल राणीने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. “एखाद्या पुरुषाचा सतत मानसिक छळ करणं, त्याला काम करण्यापासून रोखणं, त्याला घरात बसवून बरबाद होण्यास भाग पाडणं, त्याला पूर्णपणे एकटं पाडणं आणि मृत्यूच्या दारात उभं करणं… मला नाही वाटत की कोणतीही चांगली आणि एकनिष्ठ पत्नी आपल्या पतीशी इतक्या वाईट पद्धतीने वागू शकते,” असं कोमल राणी स्वर्णकार म्हणाली.
“अशा स्त्रिया मानसिक आजारी असतात, की त्या गरजेपेक्षा जास्त हुशार असतात? ज्या गोष्टी ती बंद दाराआड साध्य करू शकत नाही, त्या गोष्टी जाहीरपणे करून लोकांची सहानुभूती मिळवून साध्य करता येऊ शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना अशा महिलांना असते. तुमचा अजेंडा चालवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं थांबवा. देव प्रत्येक चांगल्या माणसाचे अशा महिलांपासून रक्षण करो,” असं कोमल राणी स्वर्णकारने लिहिलंय.
