Tanya Singh : अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचे चार महिन्यांपूर्वी निधन झालं. वयाच्या एकविसाव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनामुळे कृष्ण कुमार आणि त्यांच्या पत्नी तान्या सिंह यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिशाचं निधन कर्करोगाने झालं, असं सुरुवातीला आलेल्या रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं. मात्र, आता तिची आई तान्या यांनी मुलीच्या निधनाचं कारण कर्करोग नव्हता, असं मोठं वक्तव्य केलं आहे.

तान्या यांनी गुरुवारी त्यांच्या इन्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्यांच्या मुलीच्या आठवणींतील अनेक फोटो होते. हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी यावर एक मोठी कॅप्शन लिहिली आहे. तसेच आम्ही वैद्यकीय जाळ्यामध्ये फसलो आहोत, असं त्यांनी यातून सांगितलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : थरारक सीन्स आणि जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ सस्पेंस थ्रिलर सिनेमे आहेत प्राईम व्हिडीओवर, वाचा यादी

आपल्या पोस्टमध्ये तान्या यांनी सुरुवातीला लिहिलं, “काही दिवसांपासून मला सतत अनेक व्यक्ती नेमकं काय झालं? कसं झालं? असे काही प्रश्न विचारत आहेत. त्यांना मी आज सर्व माहिती देणार आहे. हे सत्य एखादी व्यक्ती किती नीट समजून घेते यावर अवलंबून आहे. एखादा निष्पाप जीव चुकीच्या गोष्टींमुळे अडकतो आणि अचानक समजतं की, आता फार उशीर झाला आहे. पण, शेवटी देवाच्या दारात प्रत्येकाला समान न्याय असतो आणि त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही”

मुलीला सुरुवातीला ‘कर्करोग’ झाला नव्हता : तान्या सिंह

पोस्टमध्ये तान्या यांनी पुढे लिहिलं, “सत्य हे आहे की, माझ्या मुलीला सुरुवातीला ‘कर्करोग’ झाला नव्हता. ती १५ वर्षांची असताना तिला एक लस देण्यात आली होती. त्यामुळे कर्करोगासारख्या अन्य रोगांवर मात करण्याची रोगप्रतिकारक क्षमता तिच्यात निर्माण झाली होती. मात्र, उपचारावेळी चुकीचे निदान करण्यात आले. त्यावेळी आम्हाला हे काहीच माहीत नव्हते.”

तिशाला सर्वांना ‘ही’ गोष्ट सांगायची होती

“आम्ही मेडीकलच्या या जाळ्यात अडकलो आणि आम्हाला ते आधी समजले नाही. माझी मुलगी प्रत्येक स्थितीत खंबीर होती, ती कधीच घाबरली नाही. ती सर्वात निर्भीड, धाडशी आणि शांत मुलगी होती. तिला सर्वांना सांगायचं होतं की, कधीच कोणत्याही वैद्यकीय निदानाला घाबरू नका. बायोमेडिसिनच्या मदतीने केमो साइड इफेक्ट्स यांवरही मात करता येते, हे तिला सर्वांना दाखवून द्यायचे होते.”

हेही वाचा : IFFI 2024: मराठी सीरिज ‘लंपन’ला ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळाला ‘बेस्ट सीरिज’चा पुरस्कार!

अन्य पालकांना दिला सल्ला

तान्या यांनी आपल्या पोस्टमध्ये अन्य पालकांनासुद्धा एक सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी लिहिलं, “लिम्फ नोड्स हे शरीराचे रक्षण करतात. काही वेळा भावनिक आघात किंवा पूर्वीचा आजार पूर्ण बरा न झाल्यानं त्यांना सूज येते. त्यावर बोन मॅरो टेस्ट किंवा बायोप्सी करण्यापूर्वी अन्य ठिकाणी त्यासंबंधी चौकशी करून सल्ला घ्या.” तान्या यांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर कमेंट्स करत अशा डॉक्टरांवर कारवाई केली पाहिजे, असं म्हटलं आहे.

Story img Loader