scorecardresearch

“मी लिहून देतो की हा चित्रपट…” प्रसिद्ध निर्मात्याचं ‘गदर २’बाबत धक्कादायक वक्तव्य

‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

gadar 2

‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाबद्दल एका प्रसिद्ध निर्मात्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

‘गदर’ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातल्यावर ‘गदर २’ चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा शूटिंग पूर्ण झालं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच निर्माता दिग्दर्शक कमाल आर खान म्हणजेच केआरके याने या आगामी चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

केआरकेनं ट्वीट करत लिहिलं,”कृपया इकडे लक्ष द्या. शरिक पटेल आणि झी टीमच्या मते ‘गदर २’ हा चित्रपट चित्रपटगृहात २०० कोटींचा गल्ला जमवेल. पण मी कोऱ्या कागदावर लिहून देतो हा हा चित्रपट १५ कोटींपेक्षा जास्त कमाई कमावणार नाही. तेव्हा आता हिंदी चित्रपटांच्या निर्मितीबाबत असलेलं कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचं ज्ञान तुम्हाला समजलं असेलच”.

हेही वाचा : Video: ‘गदर २’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, तारा सिंगचा जबरदस्त अंदाज एकदा पाहाच

आता त्याचं हे ट्वीट खूप चर्चेत आलं असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर यावरून अनेकांनी केआरकेला ट्रोलही केला आहे. दरम्यान २००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:16 IST

संबंधित बातम्या