बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे २५ ऑगस्ट २०२६ रोजी ७७ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज, बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला विकी कौशल व कतरिना कैफसह अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते.

कुकू कोहली यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलींनी खांदा दिला. मुलींचा हा भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कुकू कोहलींना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नी अरुणा इराणी आल्या होत्या. पतीच्या निधनाने त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. त्यांना स्वतःला सांभाळताही येत नव्हतं. त्यांचा हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कुकू कोहलींच्या अंत्यसंस्काराला विकी कौशल व कतरिना कैफ आले होते. त्याचबरोबर राजपाल यादव देखील आला होता.