नव्वदचं दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली. अनेक अभिनेते, अभिनेत्री याकाळात बॉलिवूडमध्ये दाखल झाले आणि स्टार बनले. याच काळातील एका निर्मात्याच्याबाबतीत एक मोठी घटना घडली आहे. यामुळे मनोरंजन विश्वात धक्का बसला आहे. या निर्मात्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बोल राधा बोल’ आणि ‘दस’ सारख्या हिट चित्रपटांचे निर्माते नितीन मनमोहन यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. शनिवार, ४ डिसेंबर रोजी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

येणाऱ्या पिढीला त्यांचा…” सचिन पिळगावकरांनी विक्रम गोखलेंना वाहिली श्रध्दांजली

नितीन मनमोहन हे गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत आहे. परंतु त्यांच्या प्रकृतीत विशेष बदल झालेला नाही. नितीन यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा

कोण आहेत नितीन मनमोहन?

नितीन मनमोहन हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनमोहन यांचा मुलगा आहे. मनमोहन ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. निर्मात्याच्याबरोबरीने त्यांनी अभिनयदेखील केला आहे. दूरदर्शनच्या भारत के शहीद या टीव्ही मालिकेत चंद्रशेखर आझादची भूमिका त्यांनी साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laadla film prodcuer nitin manmohan hospitalized due to heart attack spg
First published on: 05-12-2022 at 16:37 IST