हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांचा मुंबईतल्या पाली हिल मधील बंगल्यासाठी १७० कोटींहून अधिक किंमत मोजण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या इमारतीत ट्रिपलेक्स बंगल्यात दिलीप कुमार यांचं वास्तव्य होतं. या आलिशान बंगल्याच्या जागी आता द लेजंड इमारत उभी राहणार आहे. ( Dilip Kumar ) दिलीप कुमार यांचा बंगला (Sea Facing) समुद्र दर्शन घडवणारा आहे. दिलीप कुमार यांच्या बंगल्यावरुन वादही झाला होता.

मुंबईतल्या सर्वात महाग मालमत्तांपैकी एक

दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांचा बंगला पाली हिल भागात आहे. दिलीप कुमार यांचा हा भव्य बंगला मुंबईतल्या सर्वात महाग मालमत्तांपैकी एक ठरला आहे. Apco Infratech Private limited या कंपनीने हा बंगला खरेदी केला आहे. या आलिशान आणि अवाढव्य बंगल्यासाठी कंपनीने १७२ कोटी रुपये मोजले आहेत. Blackrock या कंपनीच्या मार्फत हा व्यवहार झाला आहे. ९ हजार ५२७ स्क्वेअरफूट इतक्या विस्तीर्ण परिसरातल्या या बंगल्याचा सौदा प्रति स्क्वेअरफूट १ लाख ६२ हजार रुपये अशा तगड्या किंमतीने झाला आहे. तर या मालमत्तेच्या रजिस्ट्रेशनसाठी ९ कोटी ३० लाख रुपये स्टँप ड्युटी भरण्यात आली आहे. वांद्रे भागातील मालमत्तेला मिळालेली आत्तापर्यंतची ही सर्वाधिक किंमत आहे असं Bollywood Bubble या वेबसाईटने म्हटलं आहे.

Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
MHADA, Mumbai, mhada house prices in Mumbai, expensive mhada house, house prices, 2030 house lot, expensive houses,
‘एलआयजी’तील घर अडीच कोटींचे! दुरूस्ती मंडळाकडून सोडतीसाठी मिळणाऱ्या घरांच्या विक्रीचा म्हाडासमोर पेच
Badlapur School Case Live Updates in Marathi
लोकप्रकोप : शाळेत मुलींवरील अत्याचारानंतर बदलापुरात संतापाची लाट; पालक, नागरिकांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवा दहा तास ठप्प

दिलीप कुमार यांच्या घराच्या जागी बनणार गृहप्रकल्प

२०१६ मध्ये दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांनी अशर ग्रुपसह पाली हिल येथील बंगला तोडून त्या ठिकाणी एक आलिशान घरांची इमारत उभी करण्यासाठीचा करार केला होता. या पुनर्निर्माण प्रकल्पाचं नाव द लेजंड असं आहे. या इमारतीत 4 BHK आणि 5 BHK आलिशान घरं उभारली जाणार आहेत. याच प्रकल्पात २ हजार स्क्वेअर फूट जागेवर एक म्युझियमही असणार आहे, जे दिलीप कुमार यांना समर्पित करण्यात येईल. २०२३ मध्ये विकासकाने जाहीर केलं होतं की ‘द लेजेंड’ या इमारतीत १५ आलिशान घरं बांधली जातील. आता असंही सांगण्यात आलं आहे की प्रकल्प २०२७ मध्ये पूर्ण होईल. यातून सुमारे ९०० कोटी रुपयांचा महसूल जमा होईल.

हे पण वाचा- अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार!

दिलीप कुमार यांच्या बंगल्याचा वाद काय?

काही वर्षांपूर्वी दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांच्या कुटुंबाने एका रिअल इस्टेट फर्मवर हा आरोप केला होता की या फर्मने फसवणूक करुन दिलीप कुमार यांच्या बंगल्याची कायदेशीर कागदपत्रं तयार करुन घेतली आहेत. तसंच कुटुंबाने हा दावाही केला होता की कब्जा करण्याच्या दृष्टीने हे करण्यात आलं. मात्र २०१७ मध्ये दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी हे सांगितलं होतं की, “बंगला आमच्याच ताब्यात आहे आणि चावीही आमच्याकडे आहे.” त्यानंतर हा वाद मिटला होता. दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांनी हा बंगला १९५३ मध्ये अब्दुल लतीफ यांच्याकडून विकत घेतला होता. १९६६ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केल्यानंतर दिलीप कुमार ( Dilip Kumar ) या बंगल्यात वास्तव्यासाठी गेले होते.

bollywood-celebrities-married-to-their-fans
१९६६ साली जेव्हा दोघांनी लग्न केले तेव्हा दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते आणि सायरा बानो फक्त २२ वर्षांच्या होत्या. याच वर्षी दिलीप कुमार त्यांच्या बंगल्यात राहण्यासाठी गेले होते.

दिलीप कुमार हिंदी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते

दिलीप कुमार हे हिंदी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते होते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांनी पाच दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. ट्रॅजिडी किंग अशी त्यांची ओळख झाली होती. दिलीप कुमार यांच्या अभिनयाचा प्रभाव पुढे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यावरही झाला. दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान निशान ए इम्तियाज या पुरस्काराने गौरवलं होतं. मुगल-ए-आझम, नया दौर, गंगा जमुना, देवदास, दिल दिया दर्द लिया, आदमी, राम और श्याम या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांनी काम केलं. किला हा त्यांनी केलेला शेवटचा सिनेमा होता. २०२१ मध्ये दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. आता त्यांची चर्चा पुन्हा होते आहे कारण त्यांचा बंगला १७२ कोटींना विकला गेला आहे. Bollywood Bubble ने हे वृत्त दिलं आहे.