R Madhavans new look: आर. माधवन हा अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने शेअर केलेल्या पोस्ट, फोटो कायमच लक्ष वेधून घेताना दिसतात. आता त्याने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आर.माधवनचा नवीन लूक पाहिलात का?
आर. माधवनने त्याच्या नवीन लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याचा लूक लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे. विस्कटलेले केस, डोळ्यांवर चष्मा, दाढी असा त्याचा लूक आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “एक वेगळा चित्रपट, एक वेगळा दिवस आणि एक वेगळा लूक”, शेवटी तो हसत “ओ मॅन”, असेही म्हणतो.
अभिनेत्याच्या या नवीन लूक आणि व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “सर, तुम्ही या व्हिडीओमध्ये तुमच्या मुलासारखे वेदांतसारखे दिसत आहात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तुम्ही या लूकमध्ये छान दिसत आहात.”
एकाने लिहिले, “तू इतका सुंदर कसा असू शकतोस? तू लहान होत चालला आहेस”, आणखी एकाने लिहिले, “प्लीज तुमचं स्कीन केअर रुटिन सांगा”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.
आर. माधवन अनेकदा त्याच्या भूमिकांनुसार त्याच्या लूकमध्ये बदल करतो. तो त्याच्या हेअरस्टाइल, दाढी अशा गोष्टींबाबत विविध प्रयोग करत असतो. त्याच्या पात्राची जशी मागणी असेल त्याप्रमाणे तो स्वत:मध्ये बदल करतो.
आर. माधवनच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच बिझनेस रिअॅलिटी शो गेम चेंजर्स (Game Changers)चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. दरम्यान, आगामी काळात अभिनेता कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
