scorecardresearch

Premium

“दिल तो पागल है…,” २६ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर एकत्र; नेटकरी म्हणाले, “फक्त शाहरुख…”

माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने अनेक वर्षांनी केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल

karisma kapoor and madhuri dixit
माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने अनेक वर्षांनी केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांना ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात या दोघींनी एकत्र काम केले होते. यानंतर आता तब्बल २६ वर्षांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत माधुरी आणि करिश्माने आपल्या मैत्रीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

करिश्मा आणि माधुरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यास ‘आमच्या मैत्रीचा डान्स…’ असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये दोघीही “बलम पिचकारी…” या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघीही उत्कृष्ट डान्सर आहेत याची कल्पना सर्वांना आहेच, परंतु त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना २६ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है…’ या चित्रपटाची आठवण झाली.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

करिश्मा आणि माधुरीचा डान्स पाहून नेटकरी “‘दिल तो पागल है…’ या चित्रपटाचा भाग २ काढा…” तसेच अनेकांनी “आता फक्त शाहरुखची कमी आहे… तुम्हाला सर्वांना एकत्र बघायला आवडेल” अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात माधुरी आणि करिश्माबरोबर शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती.

दरम्यान, दोघींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्यात असलेल्या मैत्रीची झलक चाहत्यांना स्पष्टपणे दिसत आहे. यावर अलीकडच्या बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर, चित्रांगदा सिंग, भूमी पेडणेकर यांनीही कमेंट करीत दोघींचे कौतुक केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 11:42 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×