Video: 'मेरा दिल ये पुकारे...' ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले | madhuri dixit copied pakistani grils steps on mera dil yeh pukare song | Loksatta

Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले

या गाण्यावर माधुरी दीक्षितने आपल्या डान्सचं रिल बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केलं.

Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले

सध्या सोशल मीडियावर ‘मेरा दिल ये पुकारे…’ हे गाणं खूप ट्रेंडमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच या गाण्यावर आयेशा नावाच्या पाकिस्तानी मुलने डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओच्या ठेक्यावर सध्या अनेकजण त्या स्टेप्स फॉलो करत व्हिडीओ बनवत आहेत. धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिलाही या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरला नाही. पण आता तिला चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्यावर माधुरी दीक्षितने आपल्या डान्सचं रिल बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केलं. हा डान्स करताना तिने आयेशाच्या डान्स स्टेप्स कॉपी केल्या आहेत. परंतु माधुरीने आयेशाच्या डान्स स्टेप्स कॉपी केलेल्या तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही.

आणखी वाचा : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला…

सोशल मीडियावर सध्या माधुरी दीक्षितच्या या डान्सचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. पण या तिच्या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत नापसंती व्यक्त केली आहे. त्यावरून आता प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा : ‘हम आपके है कौन…!’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या होत्या रीमा लागू

एका नेटकऱ्याने लिहीलं, “मॅम तुम्ही आयेशाचा डान्स कॉपी केला आहे, पण तो तिच्या इतका चांगला झाला नाही.” तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहीलं, तुमच्या सारख्या उत्तम डान्सर आणि अभिनेत्रीने दुसऱ्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करणं हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. आम्हाला तुमचं हे वागणं आवडलेलं नाही.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हीत…” त्यामुळे माधुरीवर सध्या तिचे चाहते नाराज झाल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:37 IST
Next Story
मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…