माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. १२ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असून नाना पाटेकर या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावणार होते, मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर आता अभिनेत्री सोनाली ब्रेंद्र उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जातंय. सोनालीचे ‘सोनी’ वाहिनीने व्हिडीओही शेअर केले आहेत. समोर आलेल्या एका व्हिडीओत दोघी मनसोक्त गप्पा मारताना दिसत असून माधुरीने एका दिग्दर्शकाबरोबर काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे.

माधुरी दीक्षितचे दिग्दर्शकाबरोबर झालेले वाद

माधुरी दीक्षितने आजवर अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांबरोबर काम करत हिट चित्रपट दिले, मात्र तिला सोनाली बेंद्रेने ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात तुला कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचा पश्चाताप आहे का? असं विचारल्यानंतर माधुरीने एक अनुभव सांगितला आहे. ‘सोनी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी म्हणाली, “एका चित्रपटात जरा त्रास झाला कारण दिग्दर्शक जरा हाय व्होलटेजवाला होता.” त्यावर सोनालीने “कोण होता?” असं विचारल्यानंतर माधुरी हसत म्हणाली, “नाव नाही घेणार. माझे त्याच्याबरोबर मतभेद व्हायचे. तो मला सीन सांगत असताना बोलता बोलता कुठेतरी नाहिसा व्हायचा. भावुक व्हायचा एकदम. मी कुठे गेला पाहायला जायचे तर तो टेबलाखाली रडत बसलेला असायचा.”

माधुरीचं हे बोलणं ऐकून सोनाली बेंद्रेला हसू आवरलं नाही. माधुरी पुढे म्हणाली, “एकदा मी शॉट देत होते आणि ट्रॉली शॉट होता. त्यावेळी मी सीनमध्ये असताना म्हणत होते की असं का केलं तू वगैरे तेव्हा मला रडण्याचे आवाज येत होते मी काय झालं म्हणून पाहिलं तर माझे दिग्दर्शक त्या ट्रॉलीवर बसून रडत होते.” माधुरी आणि सोनाली यादरम्यान पोट धरुन हसताना दिसल्या. यावेळी उपस्थित प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.

माधुरी दीक्षित व सोनाली बेंद्र यांच्यातील संवाद येत्या ‘कोण होणार करोडपती’च्या नवीन भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या सोनाली तिची निर्मिती असलेल्या ‘सोहळा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दरम्यान, माधुरी दीक्षित आता अखेर १२ ऑक्टोबरपासून सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच ‘कोण होणार करोडपती’चं एक अभिनेत्री सूत्रसंचालन करणार असून त्यात माधुरी दीक्षित पहिल्यांदाच रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत असल्याने ही गोष्ट तिच्या चाहत्यांची उत्सुकता आनखीनच वाढवत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ‘सोनी मराठी’वर ‘कोण होणार करोडपती’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.