Madhuri Dixit Luxury House Nameplate : अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबासह वरळी परिसरातील सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहते. ‘धकधक गर्ल’चं आलिशान घर ५३ व्या मजल्यावर असून तब्बल ५,५०० चौरस फुटांचं आहे. नुकतीच दिग्दर्शिका व प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान माधुरीच्या घरी पोहोचली होती. डॉ. नेने आणि माधुरीचं हे सुंदर घर पाहून फराह देखील भारावून गेली, घरात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने माधुरीच्या घराच्या दारावर असलेली सुंदर नेमप्लेट चाहत्यांना दाखवली.

माधुरी दीक्षितच्या या आलिशान घराच्या नेमप्लेटवर कुणाचं नाव असेल? तिचं स्वत:चं की तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंचं? असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. पण, फराहने पहिल्यांदाच माधुरीच्या घराचा प्रवेशद्वार युट्यूब व्हिडीओमध्ये सर्वांना दाखवला. यावेळी दाराबाहेर ‘Dixit Nene’ नेमप्लेट लावल्याचं पाहायला मिळालं.

माधुरीने नेमप्लेटवर ना स्वत:चं नाव लिहिलंय, ना पतीचं…त्यांनी दोघांची आडनावं नेमप्लेटवर लिहिणं पसंत केलं आहे. पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी नेमप्लेट सर्वांना पाहायला मिळाली. या नेमप्लेटसाठी कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी डॉ. नेनेंचं विशेष कौतुक केलं आहे. “नेने नेहमीच माधुरीला साथ देतात आणि तिचं यश एन्जॉय सुद्धा करतात असा नवरा पाहिजे”, “नेमप्लेट सुंदर आहे आणि दोघांची आडनावं आहेत अजून काय पाहिजे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.

Madhuri Dixit Luxury House Nameplate
माधुरी दीक्षितच्या घराची नेमप्लेट ( Madhuri Dixit House Nameplate )

याशिवाय माधुरीच्या घरात लोकप्रिय व जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी तिला भेट दिलेल्या अनेक पेंटिंग्ज लावण्यात आल्या आहेत. ते माधुरीचे die-hard फॅन होते. या आलिशान घरात म्युझिक इन्स्ट्रुमेंट्ससाठी एक वेगळा कॉर्नर तयार करण्यात आला आहे. यामध्ये गिटार, ड्रम, पियानो ठेवण्यात आले आहेत. याच्या अगदी बाजूला प्रशस्त डायनिंग टेबल आहे. तसेच माधुरीच्या घरातून सुंदर असा Sea View सुद्धा पाहायला मिळतो.