सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी (१२ मार्च) मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. रविवारी दुपारी वरळी येथील स्मशानभूमीमध्ये स्नेहलता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरी व तिचे पती श्रीराम नेने यांनी स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची माहिती दिली. आईच्या निधनानंतर माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आईचं निधन

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

माधुरी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे बऱ्याचदा आईबरोबरचे फोटो शेअर करताना दिसली. तिचं तिच्या आईवर जिवापाड प्रेम होतं हे प्रत्येक फोटोंमधून दिसून येतं. शिवाय २०२२मध्ये माधुरीने तिच्या आईचा ९०वा वाढदिवसही साजरा केला. आईच्या ९०व्या वाढदिवसानिमित्तही तिने खास फोटो शेअर केले होतं.

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

आईच्या निधनानंतर माधुरी भावूक झाली आहे. तिला आईची आठवण सतावत आहे. स्नेहलता यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत माधुरी म्हणाली, “आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसं जगायचं हे तिने आम्हाला शिकवलं. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिलं. तिची आम्हाला खूप आठवण येईल”.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

“आमच्या आठवणींमध्ये ती कायम असणार. तिची बुद्धी, सकारात्मकता, आशिर्वाद कायमच चांगली उर्जा देणारे होते. तिच्या आठवणींद्वारे आम्ही संपूर्ण आयुष्य जगू, ओम शांती”. माधुरीने तिच्या या पोस्टद्वारे आईवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच संपूर्ण आयुष्यामध्ये आईच्या आठवणी कायमच बरोबर राहतील असंही माधुरी म्हणाली. माधुरीच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या आईला कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.