Madhuri Dixit Luxury House Inside Photos : आपले आवडते सेलिब्रिटी कुठे राहतात, त्यांचं घर नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. आज आपण बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितचं घर नेमकं कसं आहे? तिचं आलिशान घर मुंबईत कितव्या माळ्यावर आहे…या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात.

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित मुंबईतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ५३ व्या मजल्यावर राहते. तिचं हे घर तब्बल ५,५०० चौरस फुटांचं आहे. अभिनेत्रीच्या या आलिशान घराच्या इंटिरिअर डिझाइनमध्ये संगीत अन् कला यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो. ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडिया’ने माधुरी दीक्षितच्या घरातील Inside फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय व जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसैन हे माधुरीचे die-hard फॅन होते. त्यामुळे त्यांनी माधुरीला गिफ्ट दिलेल्या अनेक पेंटिंग्ज तिच्या घरात लावण्यात आल्या आहेत. या आलिशान घरात म्युझिक इन्स्ट्रुमेंट्ससाठी एक वेगळा कॉर्नर तयार करण्यात आला आहे. यामध्ये गिटार, ड्रम, पियानो ठेवण्यात आले आहेत. याच्या अगदी बाजूला प्रशस्त डायनिंग टेबल आहे.

माधुरीच्या घरातून सुंदर असा Sea View पाहायला मिळतो. अभिनेत्रीने शेअर केलेल्या होमटूरमध्ये मॉडर्न किचन, प्रशस्त हॉल, बेडरुम, तिच्या घरातील सुंदर पेंटिंग्ज, बाल्कनी व्ह्यू या सगळ्याची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या दोन्ही मुलांच्या रूम्सही दाखवल्या. विशेषत: माधुरीच्या बेडरूममधून सुद्धा सी-व्ह्यू पाहायला मिळतो. अशाप्रकारे अभिनेत्रीचं संपूर्ण घर लक्झरी, मॉडर्न अन् आधुनिक डिझाइन्सचा संगम साधून सजवण्यात आलं आहे.

“मला कुटुंबात राहायला आवडतं. माझा नवरा, मुलं आणि असं एक घर असावं जिथे तुम्हाला अगदी छान वाटेल, घरात आल्यावर समाधान मिळेल…हेचं माझं स्वप्न होतं” असं माधुरी कायम म्हणते. अगदी याचप्रमाणे तिने आपलं हे ड्रीम होम डिझाइन केलं आहे.

दरम्यान, माधुरी आणि डॉ. नेने १९९९ मध्ये लग्न झाल्यावर अमेरिकेत राहायचे. मध्यंतरीच्या काळात माधुरी फक्त चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात यायची…एकंदर तिचा अमेरिका-भारत असा प्रवास सुरू होता. यानंतर २०११ मध्ये माधुरी अन् डॉ. नेने दोघंही कायमस्वरुपी भारतात आले आहेत. आता ती मुंबईत या आलिशान घरात राहते.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, माधुरी आता लवकरच ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी शो होस्ट करणार आहे. माधुरी छोट्या पडद्यावर थेट होस्ट म्हणून एन्ट्री घेणार असल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.