बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित पन्नाशीतही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा आहेत. ५५व्या वर्षीही माधुरी तिच्या फिटनेसने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते. नखरेल अदांनी चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या धक धक गर्लने स्वत:ला एक खास गिफ्ट दिलं आहे.

माधुरी दीक्षितने नवी कोरी सुपरकार खरेदी केली आहे. माधुरीने पोर्शे ९११ टर्बो एस ही गाडी स्वत: ला भेट म्हणून दिली आहे. नुकतंच माधुरी दीक्षित व तिचा पती डॉ. नेने यांनी या गाडीतून फिरताना स्पॉट करण्यात आलं आहे. माधुरी दीक्षितने खरेदी केलेल्या पोर्शै या स्पोर्ट कारची किंमत तब्बल ३.८ कोटींच्या आसपास आहे.

Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Success story Meet woman, who cracked UPSC exam without coaching
कोणताही क्लास न लावता मारली बाजी; IAS सरजना यांचा प्रेरणादायी प्रवास, विद्यार्थ्यांना दिल्या खास टिप्स
Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा>>“पोलिसांचं आयुष्य फार कठीण आहे”, रोहित शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला “सिंघम चित्रपटामुळे…”

पोर्शे ही सगळ्यात जलद गतीने धावणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. या गाडीचा रंग सिल्व्हर आहे. वेग प्रतीतास ३३० किलोमीटर इतका आहे. या कारमध्ये ३.८ लिटरचे सहा पेट्रोल इंजिन सिलेंडर आहेत. ज्यामध्ये ६४१ बीएचपी पावर निर्माण करण्याची क्षमता आहे. २.६ सेकंदात ही कार १०० किलोमीटरचा वेग पकडते.

हेही वाचा >> सेक्स रॅकेट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!

दरम्यान, माधुरी दीक्षितने सोमवारी(१७ एप्रिल) अ‍ॅपलचे कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्याबरोबर मुंबईत वडापावचा आस्वाद घेतला. माधुरी दीक्षित व कुक यांचा वडापाव खातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.