Madhuri Dixit Rents Office in Mumbai: बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या तिच्या नवीन रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. माधुरीने मुंबईतील सर्वात प्रिमियम समजल्या जाणाऱ्या लोअर परळ येथील ‘वन लोढा प्लेस’ इमारतीत ७३१ चौरस फुटांचे एक कमर्शिअल ऑफिस भाड्याने घेतले आहे. २४ मार्च २०२६ रोजी या व्यवहाराची नोंदणी पूर्ण झाली असून, माधुरीने यासाठी १७ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. पहिल्या वर्षी ती दरमहा ४.२५ लाख रुपये भाडे देणार असून, पाचव्या वर्षापर्यंत हे भाडे ५.१६ लाख रुपयांवर पोहोचणार आहे. ५ वर्षांच्या या संपूर्ण कालावधीत माधुरी एकूण २.८१ कोटी रुपये भाड्यापोटी मोजणार आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईतील परळमध्ये एक कमर्शिअल ऑफिस भाड्याने घेतलं आहे. माधुरीने हे पाच वर्षांच्या करारावर भाड्याने घेतलं आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’ने दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांसाठी माधुरी एकूण २.८१ कोटी रुपये भाडं या जागेच्या मालकाला देणार आहे.

मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, हे कार्यालय लोअर परेलमधील ‘वन लोढा प्लेस’ इथे असून त्याचे क्षेत्रफळ ७३१ चौरस फूट आहे. या ऑफिसबरोबर एक कार पार्किंगही मिळणार आहे. या करारासाठी ७२,६०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. त्याचबरोबर १,००० रुपये नोंदणी शुल्क आणि १७ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून माधुरी दीक्षितने भरले आहे.

Award Banner

पाच वर्षांच्या भाड्याबद्दल माहिती

हा भाडेकरार ६० महिने म्हणजेच ५ वर्षांसाठी करण्यात आला आहे. यासाठी पहिल्या वर्षी महिन्याला ४.२५ लाख रुपये भाडं ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात पाच टक्के वाढ होईल, त्यानुसार ४.४६ लाख रुपये महिन्याला भाडं द्यावं लागेल. त्यानंतरही दरवर्षी पाच-पाच टक्क्याने वाढ होईल. त्यानुसार, तिसऱ्या वर्षी ४.६८ लाख रुपये, चौथ्या वर्षी ४.९१ लाख रुपये आणि पाचव्या वर्षी ५.१६ लाख रुपये प्रति महिना भाडं द्यावं लागेल, असं कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

अशा प्रकारे ५ वर्षांच्या कालावधीत एकूण भाड्याची रक्कम २.८१ कोटी रुपये होईल. या व्यवहाराची नोंदणी २४ मार्च २०२६ रोजी झाली आहे. माधुरीने ही जागा रिंकू परीक्षित जोशी नावाच्या व्यक्तीकडून भाड्याने घेतली आहे. या संदर्भात माधुरी दीक्षित किंवा जागेच्या मालकाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

परळ हा मुंबईतील सर्वात प्रिमियम परिसर आहे. त्यामुळे इथे मालमत्तेच्या किमतीही खूप जास्त आहे. या भागात माधुरीने दर महिन्याला ४ लाख भाड्याने ऑफिस घेतलं आहे. हे ऑफिस तिने नेमकं कशासाठी घेतलं आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.