Madhuri Dixit : आपले आवडते सेलिब्रिटी कशी दिनचर्या फॉलो करतात, त्यांचं स्किनकेअर रुटिन, डाएट यांकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचं लाइफस्टाइल कसं आहे, प्रवासादरम्यान ती स्वत:च्या पर्समध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवते…या सगळ्याची माहिती ‘धकधक गर्ल’ने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

माधुरीने काही वर्षांपूर्वी ‘What’s in my bag’ म्हणजेच ‘माझ्या बॅगेत काय-काय आहे?’ असं कॅप्शन देत खास व्हिडीओ शेअर केला होता. आता तिच्या बॅगेत नेमकं काय-काय असतं जाणून घेऊयात…

माधुरी दीक्षित स्वत:च्या बॅगेत कायम टिश्यू पेपर ठेवते. यामागचं खास कारणही तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. माधुरी म्हणाली, “टिश्यू पेपर कायम माझ्याजवळ असतात. कारण, गाडीतून प्रवास करताना माझ्या मुलांच्या हातून काही ना काही सांडतं आणि ते विचारू लागतात… आई तुझ्याकडे टिश्यू आहे का? त्यामुळे मला टिश्यूपेपर नेहमी बॅगेत ठेवावे लागतात.”

अभिनेत्रीच्या बॅगेत नेहमी क्रेडिट कार्ड, एटिएम कार्ड आणि पैसे ठेवण्यासाठी छोटं पाऊच असतं. यासह तिच्या बॅगेत सुका मेवा असतो. माधुरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून तिच्या बॅगेत कायम एक महत्त्वाची गोष्ट ठेवते ती म्हणजे ‘टॉयलेट सीट सॅनिटायझर’.

“अनेकदा शूटिंगसाठी बाहेर गेल्यावर आपल्याला वेगवेगळे वॉशरूम वापरावे लागतात…आणि मला याची भीती वाटते. त्यामुळे टॉयलेट सीट सॅनिटायझर बॅगेत असतंच” असं माधुरीने सांगितलं.

याचदरम्यान माधुरीला तिच्या बॅगेत एक खास गोष्ट सापडते. ती म्हणजे तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा पासपोर्ट साइज फोटो. अर्थात हा फोटो बॅगेत कसा आला हे माधुरीला माहिती नव्हतं. पण, नवऱ्याचा फोटो पाहताच तिच्या चेहरा खुलतो, ती काहिशी लाजते आणि म्हणते, “हा फोटो बॅगेत कसा आला मला खरंच नाही. Anyways राम,आय लव्ह यू!”

याशिवाय तिच्या बॅगेत हँड सॅनिटायझर, मास्क, घराच्या किल्ल्या, मॉइश्चरायझर, लहान वही आणि पेन, कंगवा, सनग्लासेस, एअरपॉड्स, फ्लॉस ( जेवणानंतर दात स्वच्छ करण्यासाठी ), लिपस्टिक, लिपबाम, हेअर क्लिप, मिनी परफ्युम, पिलो मिस्ट, शुगर सब्स्टिट्यूट, दोन प्रकारच्या सनस्क्रीन, मायग्रेनच्या गोळ्या या गोष्टी असतात.