Madhuri Dixit’s special post for Husband:बॉलीवूडमधील काही जोडपी प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये माधुरी दीक्षित आणि तिचे डॉक्टर श्रीराम नेने यांचादेखील समावेश होतो. आता माधुरीने पती श्रीराम नेने यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आज (१२ फेब्रुवारी) डॉक्टर श्रीराम नेने यांचा वाढदिवस असून माधुरीने त्यांच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. माधुरीने श्रीराम नेने यांच्याबरोबरचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

“ज्या माणसाने माझ्या आयुष्यात…”

हे फोटो शेअर करत तिने लिहिले, “ज्या माणसाने माझ्या आयुष्यात आनंद, ऊर्जा आणि खूप प्रेम आणले, त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

पुढे तिने लिहिले, “तुम्ही जिथे जाता तिथे तुमची पॅशन, सकारात्मकता आणि उत्साह सगळीकडे पसरतो. तुमच्याबरोबर प्रत्येक दिवस अधिक पूर्ण, आनंदी आणि रोमांचक वाटतो.”

माधुरीने पुढे कृतज्ञता व्यक्त करत लिहिले, “आपले सुख, साहसी गोष्टी आणि आपण एकत्र घडवत असलेल्या आयुष्यासाठी मी ऋणी आहे.येणाऱ्या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम असू दे, तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले असू दे तसेच तुम्हाला सेलिब्रेट करण्यासाठी अनेक कारणे मिळू दे”, असे लिहित डॉक्टर श्रीराम नेने यांना शुभेच्छा दिल्या.

आता माधुरीच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “मेड फॉर इच अदर”, आणखी एकाने लिहिले, “तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा”, एकाने लिहिले, “माझे आवडते डॉक्टर नेने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा”, आणखी एकाने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे लिहित चाहत्यांनी श्रीराम नेने यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

डॉक्टर श्रीराम नेने हे ५९ वर्षांचे आहेत. माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी १९९९ ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर माधुरी डॉक्टर नेने यांच्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यांना दोन मुले आहेत. अरीन आण रेयान अशी त्यांची नावे आहेत.

श्रीराम नेने यांचादेखील चाहतावर्ग मोठा आहे. ते युट्यूब तसेच इन्स्टाग्राम व्हिडीओ या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अनेकदा या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या मुलांशी त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करत असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे एखाद्या बाबीबद्दल काय विचार आहेत, ते कोणत्या दृष्टीकोणातून विचार करतात हे ते जाणून घेतात. मुलांबरोबर चर्चा करताना माधुरी आणि डॉक्टर नेने त्यांना आलेले अनुभव, विविध घटना तसेच काही आठवणीदेखील शेअर करतात. याबरोबरच अनेकदा डॉक्टर नेने यांचे आई-वडील, आणि त्यांची मुले अशा तिन्ही पिढ्या एकत्र पाहायला मिळतात.

माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे तर माधुरीने मिसेस देशपांडे या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मिसेस देशपांडेनंतर माधुरी आणखी एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. माँ-बहन असे या वेब सीरिजचे नाव आहे. यामध्ये तृ्प्ती डिमरीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार असून रवी किशन या सीरिजमध्ये खास भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता चाहते माधुरीला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.