Madhuri Dixit : १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, मनोरंजनविश्वात एन्ट्री घेतल्यावर सुरुवातीला अभिनेत्रीला फारसं यश मिळालं नाही. ‘अबोध’नंतर, ‘आवारा बाप’, ‘स्वाती’, ‘हिफाजत’, ‘उत्तर दक्षिण’, ‘मोहरे’, ‘खतरो कें खिलाडी’, ‘मानव हत्या’, ‘दयावान’ असे तिचे १० चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याकाळात माधुरीच्या बॉलीवूड करिअरवर टांगती तलवार आली होती. मात्र, १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं.

१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने माधुरीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. यामध्ये तिच्यासह अभिनेते अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. ‘हिफाजत’, ‘बेटा’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘परिंदा’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना माधुरी ( Madhuri Dixit ) व अनिल कपूर यांची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली होती. ‘तेजाब’पासून या दोघांची जोडी प्रचंड गाजली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

माधुरीच्या “एक-दोन-तीन…” गाण्यावरच्या डान्सने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ११ नोव्हेंबर १९८८ मध्ये हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या एका चित्रपटाने माधुरीचं संपूर्ण आयुष्य बदललं. नुकतीच या सिनेमाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबद्दल माधुरीने पोस्ट देखील शेअर केली आहे.

माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) लिहिते, “तेजाब चित्रपटाला नुकतीच ३६ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाला माझ्या आयुष्यात नेहमीच खास स्थान राहील. एक-दोन-तीन या गाण्यावर आजही जेव्हा प्रेक्षक डान्स करतात. मोहिनीचे फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा देतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं. मला कायम प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार…”

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…

एन. चंद्रा दिग्दर्शित, ‘तेजाब’मध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर १० फ्लॉप सिनेमांनंतर हा रोमँटिक ॲक्शन ड्रामा माधुरी दीक्षितच्या फिल्मी करिअरसाठी मोठा ब्रेक ठरला. ‘तेजाब’ हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. जो ५० आठवड्यांहून अधिक काळ थिएटरमध्ये सुरू होता. या चित्रपटाचा नंतर तेलुगुमध्ये ‘टू टाऊन राऊडी’ म्हणून रिमेक करण्यात आला.

शाहरुख खानशी खास कनेक्शन

‘तेजाब’ चित्रपटाचे काही सीन्स शाहरुख सध्या राहत असलेल्या ‘मन्नत’ बंगल्यात शूट करण्यात आले होते. हा बंगला चित्रपटात अनुपम खेर यांची हवेली दाखवण्यात आली होती.

Story img Loader