Madhuri dixit tripti dimri ignore dharna durga : लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितचा प्रमुख भूमिका असलेला ‘माँ बहन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये माधुरीसह अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि इन्फ्लूएन्सर धरणा दुर्गा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र, या दरम्यान पापाराझींनी इन्फ्लूएन्सर धरणा दुर्गाला दिलेल्या वागणुकीवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले आहे. धरणाला बाजूला काढून माधुरी व तृप्तीचे फोटो काढल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘माँ बहन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धरणा दुर्गा एकत्रितपणे दाखल झाल्या होत्या. यावेळी पापाराझींना फोटोसाठी पोझ देत तिघींनी चित्रपटाचे प्रमोशन केले. मात्र, काही वेळातच पापाराझींमधून धरणाला बाजूला होण्याची विनंती केली जाऊ लागली. पापाराझींना फक्त माधुरी व तृप्तीसह फोटो हवे होते, त्यामुळे धरणाला फोटो फ्रेममधून काढून टाकत फक्त दोघींचे फोटो काढण्यात आले.
यावेळी माधुरी दीक्षितला आवाज देऊन पापाराझी फोटो काढत होते, याकडे माधुरीने दुर्लक्षदेखील केले. मात्र, त्यानंतर धरणाच्या लक्षात ही बाब आली आणि ती स्वतःहून बाजूला झाली.
माधुरी आणि तृप्ती होतायेत ट्रोल
१.८ मिलियन फॉलोवर्स असणारी आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असणारी धरणा दुर्गा ‘माँ बहन’ चित्रपटातून सिनेविश्वामध्ये पदार्पण करत आहे. मात्र, प्रमोशनवेळी पापाराझींमुळे फोटो काढताना धरणा बाजूला झाली. यावर माधुरी दीक्षित किंवा तृप्ती डिमरीने कोणतीही रिॲक्शन दिली नाही. यासाठी कोणताही विरोध न करता माधुरी व तृप्ती फोटोसाठी पोझ देत राहिल्या, यामुळे नेटकऱ्यांनी माधुरी व तृप्तीला ट्रोल केले आहे. एकत्र चित्रपटामध्ये काम केलेले असताना धरणाला दिलेली ही वागणूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली नाही. यासाठी माधुरीने तरी विरोध केला पाहिजे होता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर ‘माँ बहन’ प्रमोशनवेळी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी धरणाला दिलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, मीडियाने सर्वांना आदर देणे शिकले पाहिजे, तर दुसऱ्याने लिहिले आहे की, माधुरी व तृप्तीने यावेळी तिच्यासाठी स्डॅन्ड घेणे गरजेचे होते. या दोघींना काहीच कसे वाटले नाही. एका नेटकऱ्याने पापाराझींच्या या वागणुकीवर रोष व्यक्त करत लिहिले, मी हा चित्रपट फक्त धरणामुळे बघणार होतो, पण आता तोही बघण्याची इच्छा नाही, अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
