Premium

माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

माधुरीची दोन्ही मुलं ग्लॅमरस दुनियेपासून दूर आहेत.

madhuri dixit son

बॉलीवूड कलाकारांबरोबरच त्यांची मुलं देखील नेहमीच चर्चेत असतात. कलाकारांची मुलं काय करतात त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटींचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. काही स्टारकिड्स सिनेसृष्टीत नसले तरीही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. यापैकीच एक म्हणजे माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरीला दोन मुलं आहेत. त्यांची नावे रायन आणि अरीन अशी आहेत. गेली अनेक वर्षं ती अमेरिकेत राहत होती. तर काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबासह भारतात स्थायिक झाली. माधुरीच्या मुलांनाही मुंबईत राहायला खूप आवडतं. मुंबई स्थायिक झाल्यानंतर तिची मुलं मुंबईतील शाळा-कॉलेजमध्ये शिकली. तर आता तिच्या धाकट्या मुलाने म्हणजेच रायनने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितमुळे ऐन वेळी उर्फी जावेदला कार्यक्रमात येण्यास केली मनाई, टीका करत अभिनेत्रीने सांगितला घटनाक्रम…

रायन अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. आता त्याने उत्तम गुणांनी शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली आहे. नुकताच त्याचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी माधुरी, तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि तिचा मोठा लेक अरीनही रायनच्या आनंदात सहभागी व्हायला गेले होते. या वेळेचे काही फोटो शेअर करत माधुरी आणि श्रीराम नेने यांनी त्यांच्या मुलाबद्दल अभिमान व्यक्त केला.

हेही वाचा : Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले

माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी चार फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये रायन हातात कोट घेऊन उभा असलेला दिसत आहे, दुसरा व्हिडीओ असून त्यामध्ये रायन पदवी घेताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये रायन त्याच्या शिक्षकांबरोबर उभा असलेला दिसत आहे. तर चौथ्या फोटोमध्ये रायन, अरिन, माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत माधुरीने लिहिलं, “अभिमानाचा क्षण… माझ्या ब्रिलियंट स्टारने नवी उंची गाठल्याबद्दल त्याचं अभिनंदन.” आता या पोस्टवर माधुरीचे चाहते कमेंट करत रायनचं अभिनंदन करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhuri dixit wrote a special post for her younger son ryan for completing his graduation rnv

First published on: 31-05-2023 at 09:38 IST
Next Story
आमिर खान पुन्हा चित्रपटात कधी दिसणार? प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “जेव्हा माझी…”