scorecardresearch

“हत्या करणाऱ्याचं उदात्तीकरण…” महात्मा गांधींचे पणतू यांची ‘गांधी गोडसे’ चित्रपटावर रोखठोक प्रतिक्रिया

चिन्मय मांडलेकर यात नथुरामच्या भूमिकेत दिसणार आहे.

“हत्या करणाऱ्याचं उदात्तीकरण…” महात्मा गांधींचे पणतू यांची ‘गांधी गोडसे’ चित्रपटावर रोखठोक प्रतिक्रिया
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. चिन्मय मांडलेकर यात नथुरामच्या भूमिकेत दिसणार आहे.

गांधी वधाचा सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे.

“गुटखा विकणारे स्टार्स आदर्श…” ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांची संतप्त प्रतिक्रिया

नुकतंच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी यावर भाष्य केलं आहे. हत्या करणाऱ्या लोकांचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांचा चित्रपट पाहायची त्यांना मुळीच इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार ते म्हणाले, “मला याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही कारण गोडसे हा त्याच्यासाठी नायक आहे, आणि जर ते त्याला नायकासारखं सादर करणार असतील त्यात कुणालाच आश्चर्य वाटायला नको. चित्रपट किती योग्य आणि अयोग्य यावर मी भाष्य करणार नाही, आणि मारेकऱ्यांचं उदात्तीकरण करणारा चित्रपट पहायचा माझा हेतुही नाही.”

“तुम्हाला पैसे देऊन आम्ही…” बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनावर प्रसिद्ध निर्मात्यांची संतप्त प्रतिक्रिया

इतकंच नाही तर राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात गांधीजींचं पात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केलं असल्याचंही तुषार गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं. तब्बल ९ वर्षांनी इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त घटनेला हात घालायचं काम राजकुमार संतोषी करत आहेत. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या