बॉलीवूडमध्ये ७०-८० च्या दशकात सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून परवीन बाबी यांची ओळख होती. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीदरम्यान परवीन बाबी यांचा उल्लेख करत आठवण सांगितली आहे. महेश भट्ट यांनी 'रेडिओ नशा'ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी परवीन बाबी यांच्याविषयी बोलताना म्हटले, "आम्ही दोघे नात्यात होतो आणि जेव्हा तुम्ही कोणासोबत असता, त्यावेळी तुम्हाला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवावासा वाटतो." काय म्हणाले महेश भट्ट? 'अब मेरी बारी' हा चित्रपट मला बनवायचा होता. या चित्रपटात देव आनंद, ऋषी कपूर, टीना अंबानी आणि परवीन बाबी असणार होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, परवीन बाबीला मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागला. ती आजारी पडली आणि चित्रपटाचे शूटिंग थांबले. त्यानंतर आम्ही रेखाला तिच्या जागी चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा चित्रपटाचे शूटिंग केले, पण पैश्यांच्या अडचणीमुळे तो चित्रपट कधी पूर्ण होऊच शकला नाही." दरम्यान, परवीन बाबी यांचे कबीर बेदी यांच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर महेश भट्ट यांच्या त्या प्रेमात पडल्या. १९७७ साली परवीन बाबी आणि महेश भट्ट यांची लव्हस्टोरी सुरू झाल्याचे म्हटले जाते. परवीन बाबी यांच्या प्रेमात असलेल्या महेश भट्ट यांनी त्यांची पत्नी किरण भट्ट आणि मुलगी पूजा भट्ट यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, परवीन बाबी यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. हेही वाचा: “थिएटरमध्ये या आणि तुमची लायकी दाखवा,” वरुण धवनच्या वडिलांनी कोणाला दिलं आव्हान? म्हणाले… 'फिल्मफेअर'ला दिलेल्या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी खुलासा केला होता की, मानसोपचारतज्ज्ञांनी अभिनेत्रीला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान केले. परवीनचा भ्रम दिवसेंदिवस वाढत होता आणि त्यामुळे ते वेगळे झाले. अभिनेत्रीला वेगवेगळे भास व्हायचे. त्या कधी म्हणायच्या एअर कंडिशनरमध्ये कीडा आहे, तर कधी पंख्यामध्ये किंवा परफ्युममध्ये कीडा असल्याचा त्यांना भास व्हायचा. अनेकदा त्या वस्तू त्यांच्यापुढे उघडून दाखवल्या. पण, हा भास त्यांचा वाढत गेला; अशी आठवण महेश भट्ट यांनी सांगितली होती. परवीन बाबी यांच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, 'नमक हलाल', 'काला पत्थर', 'सुहाग', 'अमर अकबर अँथनी', 'अशांती', 'दीवार', 'दो और दो पांच', 'शान', '३६ घंटे', 'मजबूर' , 'त्रिमूर्ती' , 'काला सोना' अशा लोकप्रिय चित्रपटांत अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या आहेत..