Mahesh Manjrekar on Jaya and Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ची अँग्री मॅन म्हणून ओळख निर्माण केली. ‘शोले’ ते ‘सूर्यवंशम’, ‘पीकू’, ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. आजपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे, तसेच त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील ते सांगताना दिसतात.

लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीदेखील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि महेश मांजरेकर अभिनय करताना दिसले होते.

तसेच, २००५ ला प्रदर्शित झालेल्या ‘विरुद्ध’ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. ‘विरुद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसले होते.

Award Banner

महेश मांजरेकर म्हणाले…

महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते की, तुमचे जया बच्चन यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत की अमिताभ बच्चन यांच्याबरोबर? त्यावर महेश मांजेरकर म्हणाले, “माझे आणि अमिताभ बच्चन यांच्याशी चांगले संबंध आहेत. मला असं वाटतं की, तेव्हा माझा एक घोळच झाला.”

“विरुद्ध हा एबी कॉर्प लि. (AB Corp Ltd.) या अमिताभ यांच्या कंपनीचा चित्रपट होता. आम्ही पार्टनर होतो; पण चित्रपट त्यांचा होता मी जेव्हा अमिताभ बच्चन यांना गोष्ट ऐकवली, तेव्हा ते म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. त्यांनी मला विचारले की, माझ्या पत्नीची भूमिका कोण साकारणार आहे? मी त्यांना सांगितले की, जयाजी करतील. ते म्हणाले की, कोणीतरी दुसरे पाहिजे.”

“आता त्यांच्या डोक्यात काय असेल ते मला माहीत नाही; पण मला त्या भूमिकेत जयाजीच हव्या होत्या. पण, जयाजी यांना वाटलं की, मी त्यांना चित्रपटात घेतलं नाही. त्या प्रीमियरला म्हणालेल्या की जेव्हा यांचं नाटक कराल तेव्हा मला त्यामध्ये घ्या. पण, माझी त्या दोघांबरोबर काम करण्याची संधी गेली.”

याच मुलाखतीत ते रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभव सांगत ते म्हणाले होते की, तो माणूस खूप प्रेमळ आहे.

महेश मांजरेकर यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते काही दिवसांपूर्वी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.