दिग्दर्शक ओम राऊत आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सगळीकडे याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. ५०० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर एका कार्टूनप्रमाणे वाटत असल्याने प्रेक्षकांनी यावर टीका करायला सुरुवात केली. बहुतेक असं प्रथमच होत आहे की एखाद्या चित्रपटाबद्दल सगळ्यांच्याच भावना आणि मतं ही सारखीच आहेत. ‘आदिपुरुष’च्या टीझरला सरसकट सगळ्यांनीच नापसंती दर्शवली आहे.

व्हीएफएक्स मध्ये गडबड होणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण चित्रपटातील कित्येक दृश्यं ही इतर कलाकृतीची भ्रष्ट नक्कल आहे, तसेच रामायणासारख्या महाकाव्याला बीभत्स पद्धतीने मांडले आहे असेही आरोप लोकांनी केले आहेत. भाजपा आमदार राम कदम यांनी नुकतीच या चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली आहे. हळूहळू राजकीय वर्तुळातून या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनीदेखील यावर सडकून टीका केली होती.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

आणखी वाचा : स्वरा भास्करचं बॉयकॉट ट्रेंडबद्दल खळबळजनक वक्तव्यं; म्हणाली, “अशा भीतीच्या वातावरणात…”

आता अयोध्येतील राम मंदिरातल्या पूजाऱ्यांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे, प्रभू श्रीराम आणि रावण यांचं अयोग्य पद्धतीने केलेलं सादरीकरणावरुन मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, “या चित्रपटावर बंदी घालायलाच हवी. चित्रपट बनवणं हा काही गुन्हा नाही पण जाणूनबुजून चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त पद्धतीने राम आणि रावणाचं सादरीकरण करणं योग्य नाही.”

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांनीदेखील पुजाऱ्यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. सध्याचे चित्रपट हे हिंदूंच्या भावना दुखवणारे आहेत आणि हे कुठेतरी थांबायला हवं असं त्यांनी स्पष्ट केलं. केशव मौर्य म्हणाले, “मी अजूनही तो टीझर पाहिलेला नाही, पण जर खरंच त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र त्यात बदल करूनच तो चित्रपट सादर करायला हवा.” विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबद्दल भूमिका मांडली आहे. हिंदू समाज हे असे चित्रपट सहन करून घेणार नाही असं म्हणत त्यांनीही बॉयकॉटला समर्थन केलं आहे. एकंदरच या चित्रपटाला होणारा आणि दिवसागणिक वाढणारा विरोध बघता याच्या प्रदर्शनावर नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.