scorecardresearch

Premium

नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली!

२०१४ साली आलेल्या ‘यारियां’ चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या.

Yaariyan-2-R
(फोटो ट्विटरवरून साभार)

फिल्म प्रॉडक्शन बॅनर टी-सीरीजने बुधवारी सुपरहिट चित्रपट ‘यारियां’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. २०१४ साली आलेल्या यारियां चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण सिक्वलमध्ये मात्र तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि यश दास गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असतील.

टी-सीरिजने यारियां-२ ची घोषणा ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत केली. यावेळी निर्मात्यांनी या चित्रपटातील कलाकारांची आणि रिलीज डेटची घोषणा केली. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “नात्याने कझिन्स, पण एकमेकांचे मित्र! खऱ्या मैत्रीच्या बंधनाने जोडलेले एक कुटुंब तुमच्याकडे परत घेऊन येत आहोत. यारिया-२ १२ मे २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात,” असं कॅप्शन देत एक पोस्टर शेअर करण्यात आलंय.

Animal vs Sam Bahadur Box Office collection day 1
Animal vs Sam Bahadur: ‘अ‍ॅनिमल’ ‘सॅम बहादुर’ वर पडला भारी, विकी कौशलच्या चित्रपटाने कमावले फक्त…
animal-sequel
‘अ‍ॅनिमल’नंतर आता त्याच्या सीक्वलची चर्चा; चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षक ‘अ‍ॅनिमल पार्क’साठी उत्सुक
boman irani Birth Day Special
बोमन इराणींना लहानपणी डफर का म्हटलं जायचं? ‘मुन्नाभाई..’ सिनेमा कसा मिळाला? वाचा माहित नसलेले किस्से
Anand Mahindra Sam Bahadur Review
आनंद महिंद्रांनी केला ‘सॅम बहादूर’ चा थोडक्यात रिव्ह्यू, चित्रपट पाहण्यापूर्वी नक्की वाचा!

यारियां चित्रपटात हिमांश आणि रकुल प्रित सिंगच्या मुख्य भूमिका होत्या, तर दिव्या खोसला कुमारने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. परंतु सिक्वलमध्ये दिव्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित करतील. राधिका राव आणि विनय सप्रू ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Makers announces yaariyan 2 divya kumar khosla in lead role locks release date hrc

First published on: 12-10-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×