scorecardresearch

‘अर्जून कपूर आणि मलायकाची जोडी म्हणजे..’; ‘त्या’ व्हिडिओवरून दोघे पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

मलायका आणि अर्जूनचा एक नवा व्हि़डिओ समोर आला आहे. या व्हि़डिओवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

arjun-kapoor-malaika-arora
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा ट्रोल (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या वयापेक्षा कितीतरी पटीने मोठी असणाऱ्या मलायका डेट करण्यावरुन अनेकदा अर्जूनला नेटकऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता मलाईका आणि अर्जून एका नव्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.

हेही वाचा- “ती सगळा राग माझ्यावर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारकडे केली होती ट्विंकल खन्नाची तक्रार

एका फिल्मी कार्यक्रमात अर्जून कपूर आणि मलायका अरोराला सहभागी झाले होते. या क्रार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधाला आहे. या दोघांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका यूजरने मलायका तिचा श्वास का रोखत आहे? असा प्रश्न विचारला आहे तर एकाने फ्लॉप बीएफ आणि जीएफ म्हणत दोघांना ट्रोल केले आहे. याशिवाय काही यूजर्स दोघांचे समर्थन करताना दिसले. या दोघांचे कौतुक करताना लोकांनी मलायका आणि अर्जुनला एक अप्रतिम जोडपे असे म्हटले आहे.

कार्यक्रमात अर्जुन कपूरने जांभळ्या रंगाची कोर्ट पॅन्ट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. यासोबतच त्याने सनग्लासेस लावले होते. या लूकमध्ये अर्जुन कमाल दिसत होता. तर मलायकाने काळ्या रंगाचा लाँग लाइनचा ड्रेस घातला आहे आणि तिचे केस पोनीटेलमध्ये बांधलेले आहेत. या लूकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा- सोनाली बेंद्रेवर जडलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, म्हणालेला “तिने नकार दिल्यास…”

मलायका आणि अर्जुन कपूर त्यांचे वैयक्तिक आयुष्य शक्य तितके खाजगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र कॅमेरासमोर येण्याचे टाळतात. मात्र, या दोघांचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या