Arbaaz Khan-Shura Khan Met Malaika Arora : मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) आत्महत्या केली. अनिल मेहता यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मेहता यांची पत्नी जॉयसी पॉलीकार्प या घरातच होत्या. या घटनेनंतर मलायका अरोराच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. अनिल मेहता यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

मलायका अरोराच्या वडिलांचे अंत्यदर्शन घ्यायला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आले होते. मलायका व अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे अशा चर्चा आहेत, पण या कठीण काळात तो ही घटना घडली तेव्हापासून मलायकाच्या कुटुंबाबरोबर आहे. तसेच मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान व त्याचे कुटुंबीय मलायकाच्या कुटुंबाला धीर देताना दिसत आहेत.

“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर

मलायका अरोराच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना सर्वांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारानंतर मलायका, तिची आई जॉयसी, अमृता अरोरा सर्वजण वांद्रेतील ज्या घरी ही घटना घडली तिथे परतले. त्यानंतर अरबाज खान व त्याची दुसरी पत्नी शुरा दोघेही मलायकाच्या कुटुंबाची भेट घ्यायला आले. अरबाज व शुरा दुपारी अनिल मेहता यांचे अंत्यदर्शन घ्यायलाही गेले होते. त्यानंतर पुन्हा ते मलायकाच्या आईच्या वांद्रेतील घरी गेले. ते बराच वेळ तिथे होते.

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर

दरम्यान, अनिल मेहता यांचे जखमांमुळे निधन झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.