scorecardresearch

अंगभर कपडे घालूनही मलायका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले “अगं थोडी लाज बाळग…”

नेहमीच आपल्या आउटफिट्सने सर्वांना इंप्रेस करणाऱ्या मलायकाने आता असा ड्रेस घातला की तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे

अंगभर कपडे घालूनही मलायका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले “अगं थोडी लाज बाळग…”
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिचा शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’मुळे बरीच चर्चेत आहे. या शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर मलायकाच्याच नावाची चर्चा आहे. याशिवाय अनेकदा ती तिच्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंटमुळेही चर्चेत असते. नेहमीच आपल्या आउटफिट्सने सर्वांना इंप्रेस करणाऱ्या मलायकाने आता असा ड्रेस घातला की तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

मलायका अरोराने नुकतीच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये नेहमीप्रमाणेच मलायाका हटके लूकमध्ये दिसली. तिने हाय-फॅशन ब्रँड बॅलेंसिएगाचा शॉर्ट शिमरी ड्रेस परिधान केला होता. मलायकाचे या पार्टीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र तिच्या या लूकवर नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. “थोडी तरी लाज बाळग” असं म्हणत नेटकऱ्यांनी अंगभर कपडे घातलेल्या मलायकाला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा- “दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण

बॅलेंसिएगा या ब्रँडवर त्यांच्या अलिकडेच झालेल्या एका कॅम्पेननंतर लहान मुलांना सेक्सुअलाइज केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कॅम्पेनमुळे मोठा वादही झाला होता. अशात मलायकाने याच ब्रँडचे कपडे परिधान केल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. “लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला प्रमोट करणाऱ्या ब्रँडला पाठिंबा देताना मलायका लाज वाटयला हवी” असं नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. एका युजरने मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “एवढा वाद होऊनही तू बॅलेंसिएगाचे कपडे परिधान केलेस थोडी तरी लाज बाळग.” याशिवाय आणखी काही युजर्सनी अशाप्रकारच्या कमेंट करत मलायकावर टीका केली आहे.

malaika arora trolled

दरम्यान मलायका अरोरा सध्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. सोमवारी मलायकाच्या या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि या एपिसोडमध्ये मलायकाची मैत्रीण फराह खानने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. या शोमध्ये मलायाकाने तिचं लव्ह लाइफ, घटस्फोट आणि खासगी जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:29 IST

संबंधित बातम्या