अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. अर्जून कपूरने एका कार्यक्रमात तो सध्या सिंगल असल्याचे म्हटले होते. अर्जून कपूर हा नुकताच रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या आठ वर्षांतील त्याचा हा पहिला चित्रपट यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन कपूर एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याच्या अनेक पैलूंबद्दल बोलला होता. इतर गोष्टींबरोबरच त्याने मलायका अरोराबरोबरचे नाते संपुष्टात आल्याचे म्हटले होते. याबरोबरच त्याने रिलेशनशिप आणि एकटेपणा यावरदेखील वक्तव्य केले होते.

अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट

त्यानंतर मलायका अरोराने सोशल मीडियावर आयुष्यात त्रासदायक ठरणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी हाताळता येण्यासाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेत आहे, अशा आशयाची पोस्ट केली होती. या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे. तिने ‘नोव्हेंबर चॅलेंज’ अशी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिने लिहिले होते, नो अल्कोहोल (No Alcohol), आठ तास झोप, एक तज्ज्ञ व्यक्ती, दररोज व्यायाम, दररोज १० हजार पावले, दररोज सकाळी १० वाजेपर्यंत उपवास, प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळणे, रात्री ८ वाजल्यानंतर जेवायचे नाही आणि त्रासदायक लोकांना आयुष्यातून काढून टाकणे, अशी पोस्ट तिने अर्जून कपूरने त्यांच्या ब्रेकबद्दल उघडपणे वक्तव्य केल्यानंतर शेअर केली होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

त्याआधी जेव्हा अर्जुन कपूरने सिंघम अगेन या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात तो सिंगल असल्याचे म्हटले होते, त्यावेळीदेखील मलायकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत म्हटले, “प्रत्येक सकारात्मक विचार म्हणजे शांत प्रार्थना असते, ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलते. गुड मॉर्निंग. तुमचा दिवस चांगला जाऊ दे.”

हॉलीवूड रिपोर्टरबद्दल बोलताना अर्जुन कपूरने म्हटले होते, “मला फक्त माझी काळजी घेण्याची गरज होती. स्वत:साठी विचार करणे हे चुकीचे दिसू शकते, वाटू शकते; पण मला वाटते हा स्वार्थीपणा नाही. मी फक्त इतर गोष्टींमुळे ठीक नव्हतो. मी एकटा नव्हतो. फक्त माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या होत्या. मलायकाबरोबरच्या नात्यावर बोलणे थोडे अवघड आहे. कारण- ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, त्यातून मला आदर मिळाला आहे. मला कारणांच्या खोलात जाणे आवडणार नाही.”

हेही वाचा: दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

याबरोबरच अर्जुन कपूरने सिंघम अगेन या चित्रपटाबद्दल बोलताना, “मी या चित्रपटात काम करण्यासाठी फार उत्सुक नव्हतो. जेव्हा मी हा चित्रपटाच्या करारावर सह्या केल्या, त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अवस्थेतून जात होतो. कामाच्या बाबतीत, भावनिकरीत्या, शारीरिक, मानिसकदृष्ट्या सर्व पातळ्यांवर मी वाईट परिस्थितीतून जात होतो”, असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी २०१८ मध्ये एकमेकांस डेट करण्यास सुरुवात केली. ते नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत असत. एकमेकांबरोबरचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करीत असत. याआधी मलायका अरोराचे अरबाज खानबरोबर लग्न झाले होते.

Story img Loader