अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. अर्जून कपूरने एका कार्यक्रमात तो सध्या सिंगल असल्याचे म्हटले होते. अर्जून कपूर हा नुकताच रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या आठ वर्षांतील त्याचा हा पहिला चित्रपट यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन कपूर एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याच्या अनेक पैलूंबद्दल बोलला होता. इतर गोष्टींबरोबरच त्याने मलायका अरोराबरोबरचे नाते संपुष्टात आल्याचे म्हटले होते. याबरोबरच त्याने रिलेशनशिप आणि एकटेपणा यावरदेखील वक्तव्य केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in