“केसाला फॉइल पेपर का लावला आहे?” मलायका अरोराच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “म्हातारपणात…”

Video: हटके हेअरस्टाइलमुळे मलायका अरोरा ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

malaika arora troll
मलायका अरोरा ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. त्यामुळेच ४९व्या वर्षीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी मलायका टक्कर देताना दिसते. नुकतंच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन मलायकाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका पाठमोरी चालताना दिसत आहे. काळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस करत अभिनेत्रीने ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. पोनी बांधून हटके हेअरस्टाइल मलायकाने केली आहे. पण तिचा हा लूक चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “मी रोज सकाळी ८:३० वाजता जेवतो” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझे बाबा…”

मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. “केसाला फॉइल पेपर का लावला आहे?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका नेटकऱ्याने “उर्फीची दीदी” म्हणत अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे.

हेही वाचा>> घशाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे ४७ वर्षीय टीव्ही अभिनेत्री, आवाज जाण्याची भीती व्यक्त करत म्हणाली…

“सगळे उर्फीला कॉपी करत आहेत” अशी कमेंटही एकाने केली आहे. “म्हातारपणात ही उर्फीचा रेकॉर्ड मोडत आहे” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> Video: नऊवारी साडी, नखरेल अदा अन्…; ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली रश्मिका मंदाना, ‘श्रीवल्ली’च्या ठकसेबाज लावणीचा व्हिडीओ व्हायरल

मलायका अरोराने १९९८ साली बॉलिवूड अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. २०१७मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आता मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:32 IST
Next Story
सोनाली बेंद्रेवर जडलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, म्हणालेला “तिने नकार दिल्यास…”
Exit mobile version