शाहरुखच्या ‘छैया छैया’ गाण्यासाठी मलायकाला नव्हती पहिली पसंती; इतक्या वर्षांनी फराह खानने उघड केले गुपित |Malaika Arora was not the first choice for shahrukh khan Chaiyya Chaiyya song reveals Farah Khan | Loksatta

शाहरुखच्या ‘छैया छैया’ गाण्यासाठी मलायकाला नव्हती पहिली पसंती; इतक्या वर्षांनी फराह खानने उघड केले गुपित

मलायका अरोरा नव्हे तर शिल्पा शेट्टीसह ‘या’ अभिनेत्रींना निर्मात्यांनी केली होती विचारणा, पण त्यांनी…

शाहरुखच्या ‘छैया छैया’ गाण्यासाठी मलायकाला नव्हती पहिली पसंती; इतक्या वर्षांनी फराह खानने उघड केले गुपित
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीन शॉट)

तुम्ही आयकॉनिक गाणं ‘छैय्या छैय्या’ ऐकलं असेलच. बॉलिवूड ब्यूटी मलायका अरोरा आणि सुपरस्टार शाहरुख खान यांनी २४ वर्षांपूर्वी ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स केला होता. इतकी वर्षे झाली असली तरीही हे गाणं अजूनही लोकप्रिय आहे. मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातील हे गाणं अनेकांच्या ओठांवर असतं. हे गाणं मलायकाच्या करिअरमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? की या गाण्यासाठी मलायका ही निर्मात्यांची पहिली निवड नव्हती.

हेही वाचा – १७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री

तुम्ही खरं ऐकलंय, मलायका ही निर्मात्यांची पहिली निवड नव्हती. त्यापूर्वी जवळपास पाच अभिनेत्रींना या गाण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण त्या अभिनेत्रींनी धावत्या ट्रेनमध्ये हे गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिल्यानंतर मलायकाची निवड करण्यात आली होती, असा खुलासा चित्रपट निर्माती व कोरियोग्राफर फराह खानने केला आहे. अलीकडेच फराहने मलायकाच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या वेब शोमध्ये हजेरी लावली होती.

हेही वाचा – हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ; जंगी विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल

यावेळी गप्पा मारताना तिने मलायकाला या डान्स नंबरसाठी कसं तयार केलं होतं, त्याबद्दलची आठवण सांगितली होती. “तू छैय्या छैय्या गर्ल आहेस. पण तुझ्या सुदैवाने आधी पाच अभिनेत्रींनी ट्रेनमध्ये चढण्यास नकार दिला होता. मलायका या गाण्यासाठी रडारवर कुठेच नव्हती. आम्ही शिल्पा शेट्टी कुंद्रा, शिल्पा शिरोडकर आणि इतर २-३ अभिनेत्रींशी संपर्क साधला. एकीला ट्रेनमध्ये चढण्याचा फोबिया होता, तर एक अभिनेत्री उपलब्ध नव्हती. तेव्हा मेकअप करणाऱ्याने मलायकाचं नाव सूचवलं. तू खूप चांगली डान्सर आहे, असं तो म्हणाला. त्यानंतर तू जेव्हा शुटिंगसाठी ट्रेनमध्ये चढलीस तेव्हा हे गाणं कसं होईल याची आम्हाला उत्सुकता होती. पण गाणी किती उत्तम झालं हे तुम्हाला माहिती आहेच,” अशी आठवण फराह खानने सांगितली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:27 IST
Next Story
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री