Mamta Kulkarni dance Video: ९० च्या दशकात ममता कुलकर्णीचे अनेक सिनेमे गाजले. मात्र, त्यानंतर तिने सिनेमांतून ब्रेक घेतला. अलीकडे ममता कुलकर्णी विविध कारणांमुळे चर्चेत असते. २०२५ मध्ये ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता.
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर हे पद दिले होते. त्यावर मोठा वाद झाल्यामुळे जानेवारी २०२६ मध्ये तिने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. या दरम्यान, ती भगव्या वस्त्रांमध्ये दिसली होती. आता मात्र तिचा हा लूक पूर्णपणे बदलल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक लक्ष वेधून घेत आहे.
ममता कुलकर्णीचे डान्स व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जयपूरमध्ये पार पडलेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये तिने तिच्याच सिनेमांतील गाण्यांवर डान्स केला. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘घातक’ सिनेमातील ‘कोई जाए तो ले आए’, तसेच ‘करण अर्जुन’ सिनेमातील ‘एक मुंडा मेरी उमर का’, ‘सबसे बडा खिलाडी’ या सिनेमातील ‘लंबा लंबा घुंगट’ या गाण्यांवर तिने डान्स केला.
ममताच्या या व्हिडीओंची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. अनेक जण तिचे कौतुक करताना दिसत आहेत; तर अनेकांनी ती साध्वी बनल्याची आठवण करून दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
ममता कुलकर्णीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तिने साध्वी बनायला नको होतं. ती खूप सुंदर आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “ती किती सुंदर आहे”, एकाने लिहिले, “वेलकम बॅक”, दुसऱ्याने लिहिले, “ती जशी पंचविशीत सुंदर होती, तशीच आताही सुंदर आहे”, एकाने लिहिले, “ती आताही सुंदर दिसते.” आणखी एकाने लिहिले, “ती जशी तिच्या काळात सुंदर दिसायची, तशीच आताही सुंदर दिसते”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी ममता कुलकर्णीचे कौतुक केले.



तर अनेकांनी, “ममता कुलकर्णी तर साध्वी झाली होते, त्याचे काय झाले”, अशाही कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आता परत हिरोईन झाली का?”, दुसऱ्या एकाने लिहिले, “कमबॅक करण्याची नवीन पद्धत”, एकाने लिहिले, “जो ज्या कामासाठी बनला आहे, त्याने तेच काम केले पाहिजे”, आणखी एकाने लिहिले, “मोक्ष ते माया, असा उलटा प्रवास”, दुसऱ्याने लिहिले, “हीसुद्धा लवकरच बिग बॉसमध्ये जाणार आहे”, एकाने लिहिले, “ही तर साध्वी झाली होती ना”, आणखी एकाने लिहिले, “ही तर संन्यासी झाली होती ना?”, अशा अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.



दरम्यान, ममता कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते. व्हिडीओ, फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
