मंदिरा बेदीला एक मुलगा असून तो १३ वर्षांचा आहे. पहिला मुलगा झाल्यानंतर मंदिराला दुसरं मूल दत्तक घ्यायचं होतं आणि काही वर्षांच्या कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिने दिवंगत पती राज कौशलबरोबर मुलगी ताराला दत्तक घेतलं. आता मंदिराने ताराला दत्तक घेताना आलेल्या अडचणी व करोना काळात त्यांनी ताराला प्रायव्हेट जेटने घरी कसं आणलं, त्याबद्दल सांगितलं आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी बोलताना मंदिरा म्हणाली, “मला दुसरं मूल हवं होतं, पण ते दत्तक घ्यायचं होतं. माझा मुलगा वीर सहा वर्षांचा असताना मी मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला, पण ही एक लांब प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया का मोठी आहे, त्याची कारणं मला समजली आहेत, पण जेव्हा दत्तक घेणारं कुटुंब चांगलं आहे हे माहित होतं तेव्हा ही प्रक्रिया सोपी असावी असं मला वाटतं. पण याला वेळ लागला आणि वीर ९ वर्षांचा झाला, त्याच वेळी करोनाची साथ आली. मी राजला म्हणाले, ‘ही प्रक्रिया अजूनही झालेली नाही. का?’ आम्ही त्या प्रक्रियेचा फारसा पाठपुरावा केला नव्हता. पण मग अशी वेळ आली की मी ठरवलं हे आताच व्हायला हवं नाहीतर, कधीच नाही.”

“एक गोष्ट मी अजूनही…”, तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने पतीच्या निधनाबद्दल सोडलं मौन; हार्ट अटॅकने झाला राज कौशलचा मृत्यू

मंदिरा बेदीला लेक ताराचा फोटो मेलवर आला होता. तिचा फोटो पाहिला आणि या जोडप्याने तिलाच दत्तक घ्यायचं ठरवलं. राज कौशल सर्व फॉरमॅलिटी पूर्ण करण्यासाठी एकटा जबलपूरला गेला तर मंदिरा करोनामुळे वीरबरोबर राहिली. राजने कागदोपत्री काम पूर्ण केल्यानंतर, ताराला घरी आणण्यासाठी मंदिरा आणि वीर एका प्रायव्हेट जेटने मुंबईहून जबलपूरला गेले. मंदिरा विमानतळावर ताराला भेटली आणि तिला प्रायव्हेट जेटने मुंबईला आणलं.

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

मंदिरा म्हणाली, “हेच नशीब असतं. याआधी कधीही कारमध्ये न बसलेल्या मुलीने थेट प्रायव्हेट जेटने प्रवास केला. हे तिचं नशीब होतं. आम्ही प्रायव्हेट जेट वापरले नसते, पण त्यावेळी करोनाची साथ होती आणि व्यावसायिक विमानाने प्रवास करणं खूप धोकादायक होतं. त्यामुळे त्यावेळी तो एकमेव योग्य उपाय होता.”

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

मंदिरा बेदीने मुलीला दत्तक घेतल्यानंतरची परिस्थिती सांगितली. तिचा मुलगा वीरला तो सहा वर्षांचा असताना बहीण हवी होती, पण तो नवव्या वर्षी इतका उत्सुक नव्हता, त्यामुळे मंदिराला तिच्या निर्णयावर शंका आली. “एक चिमुरडी आमच्या आयुष्यात येतेय आणि आता आमचं आयुष्य बदलेल हा विचार करून मी खूप भारावून गेले होते. वीर रडत होता आणि मीही रडत होते. विमानतळावर पोहोचल्यावर प्लास्टिकची टोपी घातलेली ही चिमुरडी राजसोबत आली. ती खूप लहान होती. तिला कुटुंबात सर्वांबरोबर मिसळायला आणि वीरला तिला स्वीकारायला वेळ लागला,” असं मंदिराने सांगितलं.

आता वीरने ताराला बहीण म्हणून पूर्णपणे स्वीकारलं आहे आणि ते दोघेही भावंड एकमेकांवर खूप प्रेम करतात, असं मंदिराने नमूद केलं.