Premium

…जेव्हा मनोज बाजपेयींच्या पत्नीला ‘द फॅमिली मॅन’ वाटली होती मालिका; अभिनेत्याला दिलेला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

मनोज बाजपेयी यांची पत्नी शबानाने ‘द फॅमिली मॅन’ बेवसिरीज करण्यावरुन अभिनेत्याला एक सल्ला दिला होता

the-family-man
'द फॅमिली मॅन'बाबात मनोज बाजपेयींच्या बायकोने दिला होता सल्ला

अभिनेते मनोज बाजपेयी हे बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते आहेत. आतापर्यंत अनेक विविध विषयांवरील चित्रपटांतून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांची हिंदी भाषेवरही मजबूत पकड आहे. सध्या ते त्यांच्या ‘एक बंदा काफी है’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. बाजपेयी यांची ‘द फॅमिली मॅन’ बेवसिरीज चांगलीच गाजली होती. या बेबसिरीजचे दोन्ही भागांनी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. परंतु बाजपेयी यांची पत्नी अभिनेत्री शबानाने या बेवसिरीजवरुन त्यांना एक सल्ला दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, ‘त्या’ मुलीला पाहून वरुण धवनचा उडाला गोंधळ, नेटकरी म्हणाले “जुडवा २…”

मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत मनोज बाजपेयी यांना त्यांच्या आजपर्यंतच्या आवडत्या पात्रांबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर बाजपेयी म्हणाले, “माझ्यासाठी कोणतेही एक पात्र निवडणे खूप कठीण आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाविषयी काही किस्से शेअर करताना मनोज म्हणाले की, माझ्या अगोदर एक अभिनेता हा चित्रपट करत होता. गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटासाठी वर्मा माझा विचारही करत नव्हते. पण मला या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. मी अनुराग कश्यपला विनंती केली की चित्रपटासाठी माझं नाव सूचवावं. त्यानंतर एके दिवशी आरजीव्हींनी मला फोन केला आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मला खूप आनंद झाला कारण मला खरोखरच या चित्रपटात नायकाची भूमिका करायची होती आणि मला माझ्या भूमिकेप्रमाणे या नायकाला आकार द्यायचा होता.”

हेही वाचा– “माझी बायको नेहमीच…”; लग्नाच्या ८ वर्षानंतर शाहिद कपूरचे मीरा राजपूतबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

मनोज बाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन’बाबत त्यांची पत्नीची प्रतिक्रिया होती याबाबतही खुलासा केला आहे. मनोज बाजपेयी म्हणाले ही वेब सिरीज माझी पत्नी शबानासाठी समस्या बनली आहे. तिला वाटलं की मी कुठलीतरी सीरियल करत आहे. तिला ओटीटीबाबतही काहीच माहिती नव्हती. जेव्हा मी तिला याबाबत सांगितले तेव्हा तिने मला ही बेवसिरीज न करण्याबद्दल सल्ला दिला होता. शबाना म्हणाली होती, आपल्या पैशांची काय गरज आहे? सगळं काही छान चाललं असताना तू तुझं करिअर का खराब करत आहेस? असा सल्लाही शबानाने मनोज बाजपेयींना दिला होता.

मनोज बाजपेयी यांचा सध्या झालेल्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपट नुकताच ‘झी ५’ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बाजपेयी एका वकिलाच्या भूमिकेत आहे, जो बलात्काराच्या अल्पवयीन आरोपीविरुद्ध न्यायालयीन खटला लढताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 14:19 IST
Next Story
Video : “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, ‘त्या’ मुलीला पाहून वरुण धवनचा उडाला गोंधळ, नेटकरी म्हणाले “जुडवा २…”