हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

नुकतंच मनोज बाजपेयी यांनी ‘लल्लनटॉप’ या मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीदरम्यान चित्रपटक्षेत्रातील त्यांचे अनुभव, स्ट्रगल याविषयी चर्चा केली. याबरोबरच मनोज बाजपेयी जेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते दारूच्या नशेत असल्याचाही खुलासा त्यांनी केला.

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

आणखी वाचा : “माझ्या मनात शाहरुखबद्दल…” बॉलीवूडच्या किंग खानबद्दल मनोज बाजपेयी यांचं मोठं वक्तव्य

मनोज यांचा ‘शूल’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटामुळे मनोज यांना ओळख मिळायला सुरुवात झाली. या चित्रपटात मनोज यांच्यासह रवीना टंडन, सयाजी शिंदे यांच्यासारखे नावाजलेले कलाकार होते. राम गोपाल वर्मा यांनी याची निर्मिती केली होती. त्यावेळी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची खूप चर्चा होती आणि त्याकाळी मोठमोठ्या सेलिब्रिटीजसाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित केल्याचं मनोज यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

अशातच एके दिवशी राम गोपाल वर्मा यांनी ‘शूल’चं एक खास स्क्रीनिंग अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवारासाठी आयोजित केलं होतं. याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “चित्रपट स्क्रीनिंग सुरू झालं. त्यानंतर मी,रामू आणि प्रसिद्ध समीक्षक खालिद मोहम्मद आम्ही रामूच्या गाडीत गेलो. तेव्हा रामूच्या गाडीत वोडकाची बाटली कायम असायची. आमचा चित्रपट आज खास अमिताभ बच्चन पाहत आहेत म्हणून आम्ही तेव्हा गाडीतच सेलिब्रेशन केलं आणि थोडी थोडी घेतली. जेव्हा चित्रपट संपायची वेळ झाली तेव्हा राम गोपाल वर्मा हे अमिताभ यांना भेटायला जाऊ लागले, त्यांनी मलाही आग्रह केला, पण मी प्रथमच त्यांना भेटणार असल्याने दारूच्या नशेत भेटणं योग्य नाही असं मला वाटलं अन् मी खालिद मोहम्मदसह गाडीतच थांबलो.”

पुढे मनोज म्हणाले, “हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस असल्याने खालिद यांनी मला जबरदस्तीने गाडीतून उतरवलं. माझी या अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायची अजिबात इच्छा नव्हती पण काही पर्याय नव्हता. मी थोडावेळ तिथल्याच एका बाथरूममध्ये गेलो आणि काही वेळाने बाहेर आलो तर मागून अभिषेक बच्चन माझी तारीफ करत आला अन् माझ्याशी गप्पा मारायला लागला. मी त्याच्याशी बोलत असतानाच एक उंच व्यक्ती माझ्या बाजूला येऊन उभी राहिली.माझी ची कमी असल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने मी वर करून ती व्यक्त कोण आहे यांचा अंदाज बांधणार इतक्यात कुणीतरी अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं.”

आणखी वाचा : “बेगम, बादशाह, गुलाम आणि …गेम!” ‘प्लॅनेट मराठी’च्या बोल्ड कॉमेडी ‘गेमाडपंथी’ या आगामी सीरिजचा टीझर प्रदर्शित

मनोज यांना त्यानंतर काहीच सुचत नव्हतं. याविषयी मनोज म्हणाले, “माझ्यासमोर साक्षात परमेश्वर उभा आहे असा मी अमिताभ यांच्याकडे पाहात होतो. ते माझ्याशी बराच वेळ बोलत होते, माझा हात हातात घेऊन हस्तांदोलन करत होते, पण मला काहीच आठवत नाहीये कारण तेव्हा मी चांगलाच नशेत होतो. ते बोलत असतानाच त्यांचे जुने चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. त्यांचं बोलणं सुरू असतानाच मी त्याना विचारलं की एक मिठी मारू शकतो का? यावर हसत हसत मी त्यांना मिठी मारली. मला आजतागयात हे आठवत नाही की ते नेमकं माझ्याशी काय बोलले.”