Premium

“बॉबीच्या पात्राने माझ्यावर…”, ‘अ‍ॅनिमल’मधील बलात्काराच्या दृश्याचं अभिनेत्रीने केलं समर्थन; म्हणाली, “हा सीन खूपच…”

“हा सीन बॉबी देओलने साकारलेल्या अबरारच्या पात्राची…”, मानसी तक्षकचे वक्तव्य चर्चेत

Bobby Deol Mansi Taxak
बॉबी देओल व मानसी तक्षक (फोटो – इन्स्टाग्राम)

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात बॉबी देओलने अबरार नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अबरारच्या तीन पत्नी दाखविण्यात आल्या आहेत. त्यापैकी तिसऱ्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मानसी तक्षकने साकारली आहे. या चित्रपटात अबरार त्याच्या तिसऱ्या पत्नीचा बलात्कार करताना दाखविण्यात आला आहे. या सीनबद्दल मानसी तक्षकने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात एक सीन आहे, ज्यात अबरार (बॉबी देओल) तिसरे लग्न करत असतो. आनंदांचं वातावरण असतं आणि तेव्हाच त्याच्या भावाच्या मृत्यूची बातमी येते. ही बातमी ऐकून अबरारला धक्का बसतो, ही बातमी सांगायला आलेल्या व्यक्तीला तो ठार मारतो. यानंतर तो तिसऱ्या पत्नीचा बलात्कार करतो. इतकंच नाही तर तो त्याच्या पहिल्या दोन बायकांनाही मारहाण करतो. मानसी तक्षकने या सीनवर आपलं मत मांडले आहे.

कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये

बॉबी आणि मानसी यांच्यात बलात्काराचा सीन आहे, त्याचे समर्थन करत अभिनेत्री म्हणाली, “या सीनला अत्याचार म्हणून पाहिले जाऊ नये. बॉबीच्या पात्राने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. हा सीन ट्विस्ट करून पाहिल्यास अबरारमध्ये त्या वेळी प्राण्याची प्रवृत्ती पाहायला मिळते. त्यामुळे त्याने फक्त माझ्यावरच नाही तर त्याच्या सगळ्या बायकांवर स्वतःचा राग काढला.”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे ‘नॅशनल क्रश’ बनलेल्या तृप्ती डिमरीचं शिक्षण किती? जाणून घ्या तिची शैक्षणिक पार्श्वभूमी

मानसी तक्षक म्हणाली, “हा सीन खूपच धक्कादायक होता, कारण लग्नसोहळ्याचा सीन असा संपेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. संपूर्ण सेटअप अतिशय सुंदर होता. सुंदर संगीत वाजत होते, परंतु सीनचा शेवट अत्यंत वाईट पद्धतीने होतो. हे खरं तर प्रेक्षकांना सांगण्यासाठी होतं की एक ‘अ‍ॅनिमल’ (प्राणी) येत आहे. ‘अ‍ॅनिमल’ म्हणून जर रणबीर असा आहे, तर खलनायक हा नक्कीच त्याच्यापेक्षाही वाईट असणार. हा सीन बॉबी देओलने साकारलेल्या अबरारच्या पात्राची प्रतिमा तयार करण्यासाठी होता.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mansi taxak on marital rape scene in animal film defends bobby deol character abrar hrc

First published on: 10-12-2023 at 10:27 IST
Next Story
Animal vs Sam Bahadur : ‘अ‍ॅनिमल’ची क्रेझ कायम, तर ‘सॅम बहादुर’च्या कमाईतही मोठी वाढ, दोन्ही चित्रपटांचे एकूण कलेक्शन तब्बल…