हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर एका मराठी अभिनेत्याने पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने सतीश कौशिक यांना ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सतीश कौशिक हे कॅलेंडरच्या भूमिकेत दिसत आहेत.
आणखी वाचा : सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? जाणून घ्या कारण

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका

“या वर्षी आमचं calendar हरवलं यार”, असे भावूक कॅप्शन कुशलने या पोस्टला दिले आहे. त्याबरोबर त्याने रडतानाचा एक इमोजीही शेअर केला आहे. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा : “तुम्हा सर्वांना…” सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत

दरम्यान सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.