मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेचे स्टँडअप कॉमेडी करतानाचे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे प्रणितच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोलापूरात शो संपल्यावर प्रणितला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे.

बॉलीवूडमध्ये नुकताच पदार्पण केलेला अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आल्याचं प्रणित मोरेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘विनोदासाठी केली मारहाण’ असं कॅप्शन देत प्रणितच्या टीमने या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

Marathi actress Prajakta Mali visit maha kumbh mela 2025 in prayagraj
Video: प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, अनुभव सांगत म्हणाली, “लहानपणापासूनच…”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Hemant Dhome Shared Special Post For Amey Wagh
“अमुडी आता…”, हेमंत ढोमेने अमेय वाघसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा…”
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul welcome her little brother watch video
Video: फुग्यांनी सजलेली गाडी, फुलांचा वर्षाव अन्…, मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचं ‘असं’ झालं स्वागत, पाहा व्हिडीओ
bigg boss marathi sangram chougule wild card entry
‘बिग बॉस’मध्ये यंदाची पहिली Wild Card एन्ट्री! घरात आला संग्राम चौगुले; कोण आहे तो? वाचा…
Aishwarya Rai Bachchan was spotted seemingly wearing her wedding ring at Paris fashion week During Divorce Rumours
Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ
aai kuthe kay karte
‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

“२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता प्रणित मोरेचा 24K क्राफ्ट ब्रूझ, सोलापूर येथील शो संपला. स्टँडअप शोनंतर प्रणित नेहमीप्रमाणे त्याच्या सगळ्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी आला. गर्दी कमी झाल्यावर ११ ते १२ जणांचा एक गट त्याच्याजवळ आला. पण, हे लोक फोटो काढण्यासाठी आले नव्हते. त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली. त्या जमावाने अतिशय क्रूरपणे प्रणितवर हल्ला केला. लाथा मारल्या, यामुळे प्रणित जखमी झाला आहे. तन्वीर शेख या टोळीचा प्रमुख होता. बॉलीवूडचा नवोदित अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्या जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, 24K क्राफ्ट ब्रूझ याठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. अनेकदा विनंती करूनही ते आता सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. या फुटेजमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. आम्ही पोलिसांशी देखील संपर्क साधला त्यांनी मदतीचे आश्वासन दिले पण, तसे केले नाही.” अशी पोस्ट प्रणित मोरेच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रणितने या पोस्टमध्ये सोलापुरातील शो दरम्यान वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने त्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. वीर पहारियाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारानंतर वीरने देखील पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

Story img Loader