Tumbbad re-release Box Office collection Day 1: १२ ऑक्टोबर २०१८ साली बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ हा चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट सहा वर्षांपूर्वी फ्लॉप झाला होता. आता शुक्रवारी (१३ सप्टेंबरला) चित्रपट री-रिलीज केल्यावर त्याने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे.

दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांचा ‘तुंबाड’ चित्रपट पुन्हा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. सोहम शाहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हाच्या पहिल्या दिवसाच्या ६५ लाख रुपयांच्या कमाईच्या तुलनेत आता त्याने चांगली कमाई केली आहे.

navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Utkarsh Shinde
‘नवरा माझा नवसाचा २’ पाहिल्यावर उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हा चित्रपट कौटुंबिक बंध…”

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅल्कनिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ पहिल्या दिवसाच्या कमाईत मागे टाकलं आहे. करीनाच्या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘तुंबाड’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे, ते पाहता हा चित्रपट वीकेंडला आणखी जास्त कमाई करेल, अशी शक्यता आहे. (Tumbbad Budget) १५ कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने तेव्हा जगभरात १३ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता पुन्हा रिलीज झाल्यावर हा सिनेमा मूळ कलेक्शनला मागे टाकेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

Tumbbad poster
तुंबाड चित्रपटाचे पोस्टर (फोटो – राही अनिल बर्वे इन्स्टाग्राम)

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

ओटीटीवर आहे ‘तुंबाड’

Tummbad on Prime Video: दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली होती. ‘तुंबाड’ हा प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

“जवानमध्ये काम करणं हा सर्वात वाईट अनुभव”, शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल स्पष्टच बोलला अभिनेता; म्हणाला…

‘तुंबाड’ मराठीत का बनवला नव्हता?

२०१९ मध्ये ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राही अनिल बर्वे यांनी ‘तुंबाड’ मराठीत का बनवला नव्हता याचं उत्तर दिलं होतं. “मला संताप येतो या अशा प्रश्नांचा, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की त्यांनी तुंबाड पहा, किंवा माझी आधीची शॉर्टफिल्म मांजा पहा, मी अर्थात तुंबाड मराठीमध्ये करणं शक्यच नव्हतं. आत्ता कुठे मराठी चित्रपटसृष्टी श्वास घेऊ लागली आहे. अविनाश अरुण, नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणे यासारखे दिग्दर्शक आत्ता पुढे येऊ लागलेत,” असं ते म्हणाले होते.