Rani Mukerji Talks About Diet & Bengali Food : मनोरंजन विश्वात काम करत असताना कलाकारांना त्यांच्या फिटनेस, लूक्सकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे बरेच कलाकार विशिष्ट पद्धतीचा डाएट प्लॅन किंवा व्यायाम या गोष्टी फॉलो करत असतात. परंतु, असं करत असताना काही जण त्यांच्या खाण्याच्या आवडी-निवडही जपत असतात. त्याबद्दल आता बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीनं सांगितलं आहे.
राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत राणीनं तिच्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडींविषयी सांगितलं आहे. यावेळी तिनं ती काही विशिष्ट पदार्थांशिवाय राहू शकत नाही आणि त्यामुळे तिचं या बाबतीत स्वत:वर नियंत्रण नाहीये, असंही तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
भारतात अनेक प्रकारच्या खाद्य संस्कृती आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनतात. प्रत्येक राज्याचं काही वैशिष्ट्य आहे. राणी मुखर्जीला बंगाली खाद्यसंस्कृती खूप आवडते, असं तिनं सांगितलं आहे. राणी तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल काय म्हणाली जाणून घेऊयात… फइ डिसुझासह संवाद साधताना राणीनं तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं आहे
राणी मुखर्जीला तिच्या डाएटबद्दल विचारल्यानंतर म्हणाली, “नाही. एक बंगाली असल्यानं मी कधीच डाएट करू शकत नाही. कारण- मी न तळलेला मासा खाऊ शकत नाही. त्यामुळे ही माझी समस्या. मी गूळसुद्धा खाते आणि गूळ म्हणजेच साखर. फक्त त्याला साखर म्हणत नाही म्हणून ते गोड नाहीये, असं नसतं. मला भातही खायचा असतो. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सवर परिणाम होतोच; पण मी काहीच करू शकत नाही. मी आलू शद्दोही खाते, जे उकडलेल्या बटाट्यापासून बनतं. या गोष्टी मी खातेच खाते.
राणीनं यामधून ती बंगाली असल्यानं तिला बंगाली पदार्थ खूप आवडतात आणि ती रोज ते खाते. या पदार्थांशिवाय ती राहू शकत नाही. त्यामुळे डाएट करणं तिला शक्य नसल्याचं तिनं म्हटलं आहे. राणी अनेकदा बंगला खाद्यसंस्कृतीबद्दल यापूर्वीसुद्धा बोलताना दिसली आहे.
दरम्यान, राणी मुखर्जी सध्या वायआरएफची निर्मिती असलेल्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामधील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला याला प्रेक्षकांची थंड प्रतिक्रिया मिळत होती. मात्र, नंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. हा चित्रपट राणीच्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. त्यातील आशय, विषय आणि राणीचा अभिनय व संवाद लक्षवेधी ठरतात.
