Mardaani 3 Box Office Collection Day 1: रानी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला ‘मर्दानी ३’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या ‘बॉर्डर २’बरोबर टक्कर झाली. मर्दानी ३ चे ओपनिंग कलेक्शन बॉर्डर २ पेक्षा जास्त झाले की कमी, ते जाणून घेऊयात.
सनी देओल व वरुण धवन यांचा बॉर्डर २ प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले आहेत. पण आठव्या दिवशी त्याचा सामना राणी मुखर्जीच्या मर्दानी ३ शी झाला. ३० जानेवारी रोजी मर्दानी ३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, पण बॉर्डर २ समोर तो जास्त कमाई करू शकला नाही. राणीच्या मर्दानी ३ ने फक्त ३.८० कोटींची कमाई केली, तर बॉर्डर २ ने आठव्या दिवशी ११ कोटींची कमाई केली.
बॉर्डर 2 चे कलेक्शन
बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केल्यानंतर बॉर्डर २ च्या कलेक्शनमध्ये पाचव्या दिवसांपासून घट झाली आहे. ‘बॉर्डर 2’ ने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपये कमावून जबरदस्त ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी ३६.५, तिसऱ्या दिवशी ५४.५ कोटी, चौथ्या दिवशी ५९ कोटी कमावले. पाचव्या दिवशी फक्त २० कोटी कमावले. सहव्या दिवशी १३ कोटी, सातव्या दिवशी ११.२५ कोटी आणि आठव्या दिवशी चित्रपटाने ११ कोटींचे कलेक्शन केले.
१२ वर्षांत मर्दानीचे तीन भाग
मर्दानी 3 हा अॅक्शन-क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात राणी मुखर्जी पोलिसाच्या भूमिकेत आहे. तिच्या भूमिकेचे नाव एसएसपी शिवानी शिवाजी रॉयची आहे. मर्दानी ३ हा २०१४ च्या मर्दानी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. मर्दानी २ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ही कथा मानवी तस्करी आणि महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांभोवती फिरते.
२९ वर्षांनी आला बॉर्डरचा सिक्वेल बॉर्डर 2
बॉर्डर २ हा जे.पी. दत्ता यांचा क्लासिक चित्रपट बॉर्डर (१९९७) चा सिक्वेल आहे. हा चित्रपट देशभक्ती, त्याग आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा सांगतो. बॉर्डर २ ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉर्डर २ मध्ये सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी, मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा, परमवीर चीमा हे कलाकार आहेत.

