कॉमेडियन समय रैना आणि बॉलीवूड अभिनेत्री मेधा शंकर यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या आहेत. आता मेधा ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये वरुण धवन, निशांत तंवर आणि शेरॉन वर्माबरोबर दिसली. यावेळी समयने मेधाबद्दल बोलताना ती त्याची सर्वात चांगली मैत्रीण असल्याचं म्हटलं. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

समय रैनाचा बहुचर्चित ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. यामध्ये आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. अशताच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री प्रतिभा रांटा सहभागी झाली होती. गेल्या कीही दिवसांपासून समय व तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू असल्याने या कार्यक्रमातील तिच्या उपस्थितीने अनेकांचं लक्ष वेधलं. महत्त्वाचं म्हणजे समयनेही यावेळी तिला त्याची सगळ्यात चांगली मैत्रीण असल्याचं म्हटलं.

मेधाबद्दल काय म्हणाला समय?

‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’च्या एपिसोडमध्ये मॅजिशियन कबीर शर्मा एक मॅजिक अॅक्ट सादर करत होता. यावेळी त्याने समयचा फोन एका लिफाफ्यात ठेवला आणि तीन लिफाफ्यांपैकी एक निवडण्यास सांगितलं. त्यानंतर कबीरने समयला विचारलं, “तुमचा जवळचा मित्र बलराज आज आला नाही. पण आज तुमच्या पॅनेलमध्ये बसलेल्यांपैकी तुमचा सर्वात चांगला मित्र कोण आहे?” यावर समयने क्षणाचाही विलंब न करता मेधाचं नाव घेतलं. त्याने मेधा त्याची चांगली मैत्रीण असल्याचं म्हटलं त्यानंतर मेधाला तीन लिफाफ्यांपैकी एक लिफाफा निवडायला सांगण्यात आलं.

मॅजिकच्या पुढील अॅक्टमध्ये कबीरने मेधाला एक गिफ्ट देण्यासाठी निवडलं. तिच्यासमोर कार, मॅकबुक, १००० डॉलर आणि आयफोन असे अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. मात्र, मेधाच्या वाट्याला कबीर यांच्याकडून एक मिठी आला. हे पाहून समय आणि वरुण धवनही आश्चर्यचकित झाले. मेधाने मात्र या भेटीचा आनंदाने स्वीकार केला. यावर समयने मजेशीर अंदाजात मेधाला म्हटलं, “हे गिफ्ट तुझ्यासाठी होतं. एक हग! खरंच सगळ्यात खराब गोष्ट जिंकली आहे.”

जूनमध्ये सुरू झाल्या डेटिंगच्या चर्चा

समय रैना आणि मेधा शंकर यांच्या डेटिंगच्या चर्चा यावर्षी जूनमध्ये सुरू झाल्या. एका कार्यक्रमातून दोघे एकत्र बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागली. त्यानंतर जुलैमध्येही दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. नुकतंच दोघांना विमानतळावरही एकत्र पाहण्यात आलं होतं. मात्र, समय आणि मेधाने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. ‘इंडियाज गॉट लेटेंट २’च्या या एपिसोडमध्ये मात्र समयने मेधाला आपली सर्वात चांगली मैत्रीण म्हटलं. त्यामुळे दोघांमध्ये सध्या केवळ मैत्रीचं नातं असल्याचं त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याचं मानलं जात आहे.