आरस्पानी सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आठवणी आजही जीवंत आहे. त्यांच नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर त्यांनी उत्कृष्ट अभिनय केलेल्या चित्रपटांची यादी समोर येतं. कमी वयामध्येच अभिनय क्षेत्राकडे वळालेल्या मीनाकुमारी यांच्याविषयी अनेक रंजक किस्से घडले आहेत. मात्र त्यांच्या लग्नाविषयीची माहिती फारच कमी जणांना माहीत असेल. आज ३१ मार्च रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलचा एक किस्सा जाणून घेऊयात.
“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”
१ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईमध्ये जन्म झालेल्या मीना कुमारी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या वाट्याला अनेक चित्रपट आले. त्यांचे ‘पाकिजा’, ‘परिणीता’ , ‘शारदा’, ‘आज़ाद, ‘दायरा’, ‘दो बीघा ज़मीन’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट खूपच गाजले. यशस्वी चित्रपट करत असतानाच त्यांची ओळख दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाली. कमाल अमरोही यांना त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये मीना कुमारी या अभिनेत्री असाव्यात अशी इच्छा होती. मात्र कमाल यांचा स्वभाव फारसा रुचत नसल्यामुळे मीना कुमारी यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. परंतु पुढे वडीलांच्या आग्रहाखातर त्यांनी या कमाल यांच्या चित्रपटात काम करण्यास तयारी दर्शविली.
शिवीगाळ, नाकातून रक्त अन्…; वहिनीने छळाचा व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवर केले आरोप, मुंबई पोलीस ट्वीटला उत्तर देत म्हणाले…
दरम्यान, एकत्र काम करत असतानाच मीना कुमारी आणि कमाल यांचे सूत जुळले. मात्र कमाल पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे मीना कुमारी आणि कमाल यांच्या नात्याचा मीना कुमारी यांच्या वडिलांनी विरोध केला होता. त्यामुळे वडीलांचा विरोध पत्करुन हे लग्न होऊ शकणार नाही असं मीनाकुमारी यांनी सांगितलं होतं. परंतु कमाल यांच्या मित्राने मीनाकुमारी यांची समजूत काढल्यानंतर कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे मीनाकुमारी यांना लग्नासाठी पळविण्याचा पूर्ण प्लान करण्यात आला होता.
Video: “बुरखा घातलाय का?”, अथिया शेट्टीला त्या लूकवरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “हिचा चेहरा…”
मीना कुमारी संध्याकाळी क्लासला आल्या असताना त्या कमाल यांच्याबरोबर पळून गेल्या होता. मात्र क्लासची वेळ ८ ते १० असल्यामुळे त्यांना या दोन तासामध्येच लग्न आटोपायचे होते. यासाठी दोघांनीही घाईघाईमध्ये १४ फेब्रुवारी १९५२ रोजी केवळ दोन तासात लग्नगाठ बांधली. मात्र त्यांचा हा संसार फार काळ टिकू शकला नाही. त्यांनी १९६४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विभक्त राहत असलेल्या मीना कुमारी यांचं ३१ मार्च १९७२ रोजी लिव्हर सोरायसिसने निधन झालं होतं.